![]()
गडहिंग्लज मध्ये उद्या सोमवारी पदयात्रा
चंदगड : प्रतिनिधी –
विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवाजीराव पाटील हे शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ असून त्यासाठी उद्या सोमवारी सकाळी १० वा. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने पदयात्राचे आयोजन करण्यात आले आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, आजी-माजी जि.प. सदस्य, आजी – माजी पं. स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, सुपर वॉरियर्स, कार्यकर्ते, युवक, युवती, महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले असून म.धु. श्रेष्ठी आण्णा विद्यालय मैदान (रिलायन्स पेट्रोल पंप शेजारी), संकेश्वर रोड- गडहिंग्लज येथून ही पदयात्रा सुरु होईल.

