![]()
ग्रामीण अध्यक्षपदी बाळासाहेब माने, शहर पूर्व अध्यक्षपदी श्रीरंग खवरे तर शहर पश्चिम अध्यक्षपदी शशिकांत मोहिते
इचलकरंजी : प्रतिनिधी

दोन महिन्यांपासून प्रलंबित राहिलेल्या भारतीय जनता पार्टीच्या इचलकरंजी विधानसभा मंडलच्या ग्रामीण, शहर पूर्व आणि शहर पश्चिमच्या निवडी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जाहीर करण्यात आल्या. इचलकरंजी ग्रामीण अध्यक्षपदी बाळासाहेब वाल्मिक माने, इचलकरंजी शहर पूर्व अध्यक्षपदी श्रीरंग शिवाजी खवरे आणि इचलकरंजी शहर पश्चिम अध्यक्षपदी शशिकांत बाबुराव मोहिते यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी या निवडी जाहीर केल्या.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील तीन मंडलच्या अध्यक्षपदी बाळासाहेब माने (ग्रामीण), श्रीरंग खवरे (पूर्व) आणि शशिकांत मोहिते (पश्चिम) नांवे निश्चित करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव या निवडी जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. यामध्ये पूर्व अध्यक्षपदाच्या नांवावरून या निवडी दोन महिन्यांपासून रखडल्या होत्या, अखेर गुरुपौर्णिमेच्या दिनी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश महामंत्री राजेश पांडे यांच्या आदेशावरून कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी यां कोल्हापूर ग्रामीण पूर्व जिल्हा कार्यक्षेत्रातील प्रलंबित इचलकरंजी विधानसभेतील तीन मंडल अध्यक्षांच्या नांवाची घोषणा केली आहे. त्यामध्ये इचलकरंजी ग्रामीण अध्यक्षपदी बाळासाहेब वाल्मिक माने, इचलकरंजी शहर पूर्व अध्यक्षपदी श्रीरंग शिवाजी खबरे आणि इचलकरंजी शहर पश्चिम अध्यक्षपदी शशिकांत बाबुराव मोहिते यांची निवड करण्यात आली आहे. या कामी माजी वस्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. निवडीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.