![]()
सदस्य पदावरूनही हकालपट्टी

चंदगड : प्रतिनिधी
देवरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच गीतांजली शंकर सुतार यांना सरपंच व सदस्य पदावरून काढून टाकण्यात येत असल्याचा निकाल पुणे येथील विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिला. देवरवाडी ग्रामपंचायत विकासकामे होत नाहीत. वेळेवर ग्रामसभा, मासिक सभा होत नाहीत, या संबंधी अर्जदार राजाराम जाधव यांच्यासह चार सदस्यांनी २३ सप्टेंबर २०२२ रोजी वरिष्ठांकडे तक्रार करून एकूणच कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्ताना अहवाल पाठवला. सरपंच व ग्रामसेवक यांनी कायदेशीर प्रमाणकाशिवाय निनावी केलेले खर्च १८ लाख ९९ हजार होतो. पंचायतीने मिळकतीमध्ये केलेले फेरफार रितसर नाहीत. फेरफार कारण्याबाबत ग्रामपंचायतीचा ठराव नंबर व दिनांक नमूद नाही. मासिक सभा इतिवृत्त अपूर्ण ठेवणे, ग्रामसमा न घेणे, याबाबत स्पष्ट झाल्याचे अहवालात म्हटले होते. विभागीय आयुक्तांनी सरपंच गीतांजली सुतार यांना पदावरून काढण्याचा निकाल देताना उपसरपंच गोविंद आढाव, सदस्य मनिषा भोगण, प्रभावती मजूकर, मंजुळा कांबळे यांच्याविरुद कारवाई करणेची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे. अर्जदारांच्या वतीने ऍड. किशोर पाटील, ऍड. एस. के. सावंत आणि ऍड. बी. जी. कांबळे यांनी काम पाहिले.
