![]()
अन्वेषण लाईव्ह इफेक्ट : चंदगड फाटा ते आंबोली रस्त्याची जागृती सुरू
चंदगड : प्रतिनिधी
चंदगड फाटा ते आंबोली हा एक प्रमुख रहदारीचा मार्ग असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. दुचाकीसह सर्वच प्रकारच्या वाहनांना हा रस्ता म्हणजे जीवघेणा प्रवास बनला आहे. या समस्येकडे लक्षवेध करून या जीवघेण्या प्रवासातून जनतेला मुक्त करावे या आशयाची बातमी अन्वेषण लाईव्ह न्यूज ने प्रसिद्ध केली होती. या रस्त्याचा वापर करणारे लोक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचेही वृत्त अन्वेषण लाईव्ह ने प्रसिद्ध केले. या खळबळ जनक पुस्तकाचा परिणाम म्हणून सार्वजनिक बांधकामने या रस्त्यावरील ठिकठिकाणी खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. युद्ध पातळीवर जरी नसले तरी किमान जनतेला जीव घेण्या प्रवासातून मुक्त करण्याची सुरुवात कधी झाली. अन्वेषण लाईव्ह न्युज चे वाचक सर्वांनाच धन्यवाद देत आहेत.

