साक्षात विठ्ठल रूखमाई अवतरली : आजऱ्यामध्ये बाल वारकऱ्यांची मांदियाळी

साक्षात विठ्ठल रूखमाई अवतरली : आजऱ्यामध्ये बाल वारकऱ्यांची मांदियाळी

Loading

आजरा /हसन तकीलदार

येथील व्यंकटराव शैक्षणिक संकुल अंतर्गत व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिर मधील इयत्ता पहिली ते चौथी या वर्गातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आज आषाढी एकादशी निमित्त साक्षात विठ्ठल- रखुमाई, आणि वारकरींची वेशभूषा केली. साक्षात पांडुरंगाच्या नामाचा गजर.. टाळ मृदुंगाच्या नादात साक्षात या बालचमु वारकऱ्यांची दिंडी प्रशालेच्या प्रांगणात व विठ्ठल रुक्माई मंदिर,आजरा शहरात काढण्यात आली. साक्षात विठ्ठल रुक्मिणी अवतरली तर विद्यार्थी, पालक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या सहभागाने वारकऱ्यांची मंदियाळी आजराकरानी अनुभवली. टाळ मृदंगचा नाद आणि हरी नामाचा गजर याने तर शाळेचा परिसर भक्ती सागरात बुडाला. दरम्यान मैदानावर रिंगणसोहळाही झाला.

 बाल वारकरी विद्यार्थी मंडळींना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष  जयवंतराव शिंपी, सचिव  अभिषेक शिंपी, खजिनदार सुनील पाटील, संचालक  सचिन शिंपी,  विलास पाटील, प्राचार्य  एम एम नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ व्ही.जे शेलार,आर. व्ही. देसाई (मुख्याध्यापक ), डी.बी.डेळेकर, सौ.एल.पी.कुंभार,

सौ.एन. एन.पाष्टे, सौ.एन.सि. हरेर, सौ.आर एच गजरकर,सौ.एम. व्ही.सावंत उपस्थित होते

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *