रस्ता नवा पण समस्या जुन्या : आजरेकरांच्या समस्या मात्र तशाच राहिल्या

रस्ता नवा पण समस्या जुन्या : आजरेकरांच्या समस्या मात्र तशाच राहिल्या

Loading

आजरा : हसन तकीलदार –

संकेश्वर बांदा महामार्ग झाला परंतु आजरेकरांच्या समस्या मात्र तशाच राहिल्या आहेत. वाहतुकीची समस्या, रस्त्यावर पाणी या समस्या आहेतच. हे दृश्य आहे छत्रपती संभाजी चौक आजरा येथीलआहे. गेल्या दोन महिन्यांपासून आजऱ्यात पावसाचा कहर सुरूच आहे. पाऊस काही थांबेना समस्या काही सुटेना अशीच एकूण अवस्था झाली आहे. भारत नगरपासून वरून येणारे पाणी थेट व्यंकटराव हायस्कुल, तहसील कार्यालय असे थेट रस्त्यावरून पाणी खाली छत्रपती संभाजी चौकापर्यंत येत आहे. रस्ता खाली गटारी वर असे ढिसाळ नियोजन झाल्यामुळे गटारीतूनपाणी न जाता रस्त्यावर येत आहे. शेवटी तेथील काही युवकांनी दुर्गा स्वीट होम समोर तीन चार ठीकणी गटारीला होल पाडून पाण्याचा काही प्रमाणात निचरा केला. तरीसुद्धा रस्त्यावर पाणी साचले. वाहन धारक, मोटसायकल स्वार, पदचारी आदिना याचा त्रास होत आहे. गटारीतून पाणी काढण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाय आखावेत अशी नागरिकांतून मागणी होताना दिसत आहे.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *