आजरेकर यांच्यासह स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा खालावली

Loading

सर्वांनी एकत्रित लक्ष देण्याची गरज उद्योजक प्रकाश कोंडूसकर यांचे प्रतिपादन 

आजरा / हसन तकीलदार

आजरा तालुका नशीबवान कि कमनशिबी ठरविणे हे आज संशोधनाचा विषय असून या तालुक्याला हक्काचा आमदारच सध्या नाही तर आजऱ्याची तीन शकले केली आहेत. विधासनसभा मतदार संघात भुदरगड, चंदगड आणि कागल या तालुक्यांना आजरा तालुका वाटणी करून विभागल्यामुळे तालुक्याची पुरती वाट लागली असून आजरेकरांसह स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा खालावली आहे असे प्रतिपादन उद्योजक प्रकाश कोंडूसकर यांनी केले. आजरा चंदगड मतदार संघाला जोडला होता त्यावेळी तालुक्यात हक्काचा आमदार असायचा असे बोलून विधासनसभा मतदार संघात भुदरगड, चंदगड आणि कागल या तालुक्यांना आजरा तालुका वाटणी करून विभागल्यामुळे तालुक्याची पुरती वाट लागली आहे असे ते म्हणाले. कोणताही आमदार पुर्णवेळ लक्ष देत नसल्यामुळे आजऱ्याच्या विकासाला खिळ बसलीय. तीन आमदार असल्यामुळे विकासामध्ये विषमता येत आहे. त्यातच पुन्हा एकदा आजऱ्याला झटका बसला आहे. आजरा नगरपंचायत झाल्यामुळे मोठी नागरी मतदार संख्या वगळण्यात आली. परंतु यामुळे मतदार संघ कमी होईल याची कोणालाही पुसटशी कल्पना नव्हती. एक जिल्हापरिषद म्हणजे पंचायत समितीच्या दोन जागावर गंडांतरआले आहे. याबाबत आजरा तालुक्यातील सोहळे येथील उद्योजक प्रकाश कोंडूसकर यांनी आपले मत मांडले. 
 निवडणूक आयोगाच्या परिसिमन समितीने प्रत्येकवेळी आजरा तालुक्यावर अन्याय केले आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम झालेले आहे.विधानसभा मतदार संघाचे तीन तुकडे करून तालुक्यातील जनतेची पिळवणूक झालेली असताना सुद्धा पुन्हा एकदा तालुक्यातील जिल्हापरिषदेचा एक आणि पंचायत समितीचे दोन गण कमी करणेत येत आहेत. तालुका दुर्गम, डोंगराळ आणि वाडीवस्तींचा आहे. छोटी -मोठी खेडी विरळ लोकसंख्या अशी रचना असल्यामुळे तालुक्याला स्वतंत्र विधानसभा मतदार संघ घोषित करता येत नाही. हे माहित असताना सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आणखीन एक धक्का देऊन आजरा तालुकावासीयांची घोर निराशा केली आहे. शासनाचे म्हणणे आहे कि, लोकसंख्या निहाय मतदार संघाची रचना केली आहे. परंतु जनगणना होऊन कित्येक वर्षे लोटून गेली तालुक्यात शंभरच्यावर वाडी वस्ती खेडी झाली आहेत. कोणत्या सालाची जनगणना ग्राह्य धरून रचना केली जात आहे हेच कळत नाही. पूर्वीचे आजरा जिल्हा परिषद मधून फक्त आजरा नगरपंचायत वेगळी झाली नंतर उर्वरित गावामधून  लोकसंख्येचा विचार करून पेरणोली, कोळींद्रे, उत्तूर मतदार संघ घोषित करून आरक्षणाची सोडतही झाली होती. मग आता कुठे माशी शिंकली? याचे गौडबंगाल काय? याची सखोल माहिती आजरेकरांनी घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील नेते मंडळींनी, सुज्ञ जनतेने तसेच सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याबरोबर पत्रकार बंधूनीही एकत्र येऊन आजरा तालुक्यावरील राजकीय अन्यायाविरोधात आवाज उठवणे काळाची गरज आहे. पूर्वीप्रमाणे आजरा तालुका कोणत्याही एका तालुक्यात समविष्ट करून विधानसभा मतदार संघ झाल्याखेरीज तालुक्यातील नेत्यांना वजन आणि प्रतिष्ठा येणार नाही हे ही तितकेच सत्य आहे. तीन तुकडे झाल्यामुळे आजरेकरांची आणि स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा कमी झाल्याचे वाटते त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन यासाठी लक्ष देण्याचे आवाहन कोंडूसकर यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *