![]()
चंदगड तालुक्यात जोरदार मोहीम
चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कोल्हापूर व कृषि विज्ञान केंद्र कणेरी यांचे संयुक्त विद्यमाने विकसित कृषि संकल्प अभियान (कृषि रथयात्रा) दिनांक २९ मे २०२५ पासून कोल्हापूर जिल्हामध्ये सुरु आहे. हे अभियान चंदगड तालुक्यामध्ये दिनांक ११ जुने २०२५ ते १२ जून २०२५ अखेर राबविनेत येणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश आधुनिक कृषि तंत्रज्ञान ,सुधारित पिके ,पशुपालन ,मत्सपालन तसेच विविध सरकारी योजना व धोरणांची माहिती देणे असून या अभियान अंतर्गत श्री सिद्धगिरी कृषि विज्ञान केंद्र कणेरी , कृषि विभाग चंदगड यांचे मार्फत कृषि तज्ञांशी थेट संवाद व मार्गदर्शन होणार आहे.
कृषि क्षेत्रातील आधुनिक व सुधारित तंत्रज्ञानाची माहिती , कृषि योजनांची माहिती , सेंद्रीय शेती व नैसर्गिक शेती बाबत माहिती, खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे लागवड तंत्रज्ञान व बीज प्रक्रिया मोहीम , एकात्मिक हुमणी नियंत्रण व मोहीम ,मृदा आरोग्य ,पी एम किसान इ के वाय सी , अॅग्रीस्टॅग फार्मर आयडी नोंदणी करणे या बाबत माहिती मिळणार आहे. तालुक्यामध्ये खालील प्रमाणे कृषि रथ फिरविण्यात येणार असून वरील माहिती देण्यात येणार आहे. तालुक्यातील ज्यास्तीतज्यास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विभाग , आत्मा विभाग व श्री सिद्धगिरी कृषि विज्ञान केंद्र कणेरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
चंदगड तालुक्यातील अभियानाचे नियोजन खालील प्रमाणे
बुधवार दिनांक ११.०६.२०२५ रोजी तुर्केवाडी सकाळी ८.३० ते ९.३० – मांडेदुर्ग सकाळी १०.०० ते ११.०० – ढोलगरवाडी ११.३० ते १२.३० – कोवाड दुपारी २.३० ते ३.३० – निटटूर ४.०० ते ५.०० – कडलगे बुद्रुक ५.३० ते ६.३०
गुरुवार दिनांक १२.०६.२०२५ रोजी दाटे सकाळी ८.३० ते ९.३० – हलकर्णी सकाळी १०.०० ते ११.०० – तुडीये ११.३० ते १२.३० – सातवने दुपारी २.३० ते ३.३० – आडकुर ४.०० ते ५.०० – शिरोली ५.३० ते ६.३० असे अभियान राबवण्यात येत आहे.

