सामाजिक कार्यकर्ते दगडू माने यांना राज्य शासनाचा डॉ आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर

Loading

मुंबई येथे मंगळवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्यमंत्र्यासह मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान

शिरोळ : प्रतिनिधी –
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते , सिनेअभिनेते व प्र के अत्रे सर्वोत्कृष्ट पुरस्कार सन्मानित डॉ. दगडू श्रीपती माने यांना जाहिर झाला आहे.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह (नरिमई पॉईंट ) येथे मंगळवारी १० जून रोजी सकाळी दहा वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदिप कांबळे , समाज कल्याण पुणे विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. याबाबत शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कार्यालयाने पत्रकार डॉ दगडू माने यांना लेखी पत्र पाठवले आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर ,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, नगर विकास वैद्यकीय शिक्षण मंत्री माधुरी मिसाळ, लोकसभा सदस्य अरविंद सावंत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.मुंबई येथे होणाऱ्या या समारंभाला महाराष्ट्रातील नामांकित राजकीय ,सामाजिक, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने यांनी तीन दशकाहून अधिक काळ सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात आदर्शवत कार्य केले आहे. महापूर व कोविड काळात पूरग्रस्त व सामान्य जनतेच्या प्रश्नावर आंदोलने करून जनतेला न्याय मिळवून दिला आहे. लोकहितार्थ सामाजिक चळवळीचा कार्यकर्ता व पत्रकार म्हणून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून नाटक , पथनाट्य व लोककलेच्या माध्यमातून त्यांनी रंजनातून प्रबोधन चळवळ राबवली आहे. त्याशिवाय चित्रपट , वेबसिरीज व लघुचित्रपटातून त्यांनी विशेष भूमिका साकारली आहे. शिरोळ तालुक्यासह जिल्ह्यात सुरू असलेल्या फुले – शाहू – डॉ आंबेडकर चळवळीच्या कार्यात कार्यकर्ता म्हणून त्यांचे मोठे योगदान आहे. गोरगरिब, निराधार व दिव्यांग यासह जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी केलेल्या लोकसेवेच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ दगडू माने यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *