अखेर बहुजन मुक्ती पार्टीचेआंदोलन होणारच

अखेर बहुजन मुक्ती पार्टीचेआंदोलन होणारच

Loading

वनविभागाशी चर्चा पण निर्णय नाही

आजरा / हसन तकीलदार

आंदोलक आणि कार्यकर्त्यांची वनविभागाच्या अधिकारी आणि प्रतिनिधींशी चर्चा झाली मात्र सकारात्मकता नसल्याने अखेर बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन होणारच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिनांक 26 मे रोजी वनविभागआजरा येथे बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ३० मे २०२५ रोजीच्या धरणा प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. परंतु वनक्षेत्रपाल मनोजकुमार कोळी अचानक मिटिंगसाठी बाहेरगावी गेले. वनपाल भरत निकम व मुजावर यांचेशी बहुजनमुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रदीर्घ संवाद केला. बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने येत्या 30 मे 2025 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात ही मुख्य मागणी आहे. शेतकऱ्यांना अनेक समस्या असूनही वनविभाग त्यावर उपाय योजना करत नसल्याचा आरोप यावेळी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला. 

यावेळी मागील महिन्यात गव्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्याना अद्याप नुकसान भरपाई का मिळालेली नाही? असा सवाल उपस्थित करून जाब अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. याशिवाय वनविभागाला बहुजन मुक्ती पार्टीने दिलेल्या दिलेल्या निवेदनावरआपण आतापर्यंत काय कारवाई केली आणि मार्ग काढला? याचाही जाब विचारण्यात आला. सरकारचा जी.आर. आहे की तात्काळ नुकसान भरपाई अथवा मोबदला दिला पाहिजे. दोन महिने उलटून गेले तरी अजून मोबदला नाही असे विचारता कागद पत्रांच्या मध्ये काही त्रुटीआहे असे यावेळी उपस्थित वनअधिकाऱ्यांनी सांगितले. 

“ऍनिमल अटॅक “हा एक शब्दनाही म्हणून मोबदला थांबला. ही चूक खात्याची आणि निस्तरायचं ग्रस्तानी अशी अवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे वन तळे, गवत लागवड आणि वृक्षारोपण यासारख्या मुद्द्यासाठी 30 मे ला वनविभागाच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन बहुजन मुक्तीपार्टीच्या वतीने करण्यात येत आहे. आंदोलनामध्ये जिल्हा उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद हे उपस्थित राहिले पाहिजेत असा आग्रह बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी धरला. बहुजन मुक्ती पार्टी ने हातात घेतलेला विषय हा सर्व आजरेकर तसेच कोल्हापूरकरांचा गंभीर विषय असल्याने सगळ्यांनी या आंदोलनाचा सहयोग द्यावा असे आवाहन यावेळी बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केले. 

जोपर्यंत लेखी उत्तरे मिळणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहील तसेच टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तिव्र केले जाईल असे यावेळी डॉ.तिलकरत्ने यांनी इशारा दिला. यावेळी डॉ. सुदाम हरेर, राहुलमोरे, अमित सुळेकर, दत्तराज पाटील, रोहिदास दारुडकर, इर्शाद भडगावकर, सुरेश दिवेकर,झुल्फिकार शेख, सूर्यकांत कांबळे, अंकित कांबळे यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *