पूल कॅम्पसमध्ये ७३ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

पूल कॅम्पसमध्ये ७३ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

Loading

संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी : २.७० लाखांचे पॅकेज

 गडहिंग्लज : प्रतिनिधी

-महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहातील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पूल कॅम्पसमध्ये ७३ विद्यार्थ्यांची ॲडविक ऑटोकॉम्प प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक वेतन २.७० लाखांचे पॅकेज मिळणार आहे. महाविद्यालयातील ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट विभागामार्फत हा उपक्रम  झाला. यामध्ये सुमारे ११६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ८ मे रोजी या कॅम्पसचे आयोजन करण्यात आले. मेकॅनिकल विभागातून १२, इलेक्ट्रॉनिक विभागातून ३१ आणि इलेक्ट्रीकल विभागातून ३० असे एकूण ७३ विद्यार्थ्यांची निवड झाली.याकामी संस्था अध्यक्ष ॲड. (डॉ.) अण्णासाहेब चव्हाण, संस्था सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण, विश्वस्त डॉ.यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, रजिस्ट्रार शिरीष गणाचार्य, प्राचार्य डॉ. संजय सावंत, उपप्राचार्य प्रा. एस. टी. मातले, सेंट्रल प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. संतोष गुरव, ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एस. आय. जबडे यांचे मार्गदर्शन लाभले. तर ऑफिस सुपरीटेंडेंट,सर्व विभागप्रमुख, सर्व ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट समन्वयक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *