![]()
प्रशासनाची उदासीनता विरोधात शिवसैनिक आक्रमक
चंदगड / तातोबा गावडा
बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी करत शिवसेनेच्या वतीने पाटणे फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले. रस्त्याची दयनीय अवस्था, अपघातांची मालिका, प्रशासनाची उदासीनता विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले.
तर “वर्षभरात रस्त्याचे रुंदीकरण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना सैल सोडणार नाही. चंदगड तालुक्याची ओळख जिल्ह्यात न्हवे तर महाराष्ट्रात असून या बाबतीत प्रशासन एवढं उदास का? असा सवाल प्रा. सुनील शिंत्रे यांनी यावेळी उपस्थित केला. चंदगड तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली असून, अपघाताना शासन जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रश्नी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. चंदगड विधान सभा प्रमुख राजू रेडकर, ऍड. संतोष मळवीकर यांनीही आरोपांना समर्थन केले. तर शिवसेचे विष्णू गावडे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने यांचीही भाषणे झाली. आंदोलनामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली.
आंदोलनकर्त्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. मुल्ला यांनी स्वीकारले. या प्रसंगी अवधूत पाटील, किरण नागुर्डेकर,उदय मंडलिक,महेश पाटील, भरमु बिर्जे,कार्तिक सुतार, दयानंद रेडेकर,अशोक पाटील,अनिल फडके,अनिल फडके, मोहनगेकर,अवधूत भुजभळ, ज्ञानेश्वर माने,तानाजी पाटील,मनोज रावराणे,कल्लाप्पा सुळेभावकर,प्रवीण कोळसेकर, शिवा अंगडी, बाबू चौगले,श्रीधर भाटे, कल्पेश पाटील, तुकाराम पाटील, उपस्थित होते.

