अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे साजरा

जयसिंगपूर : प्रतिनिधी-

डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट संचलित, धरणगुत्ती ता. शिरोळ येथील अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज मध्ये प्रोफेसर. एम. एल. श्रॉफ यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून नॅशनल लेव्हल हरबल प्लांट फोटोग्राफी स्पर्धा संपन्न झाली. यावेळी प्रो.एम. एल. श्रॉफ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सचिन निटवे यांनी नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे चे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी प्रो. एम. एल. श्रॉफ यांच्या कार्याचा आढावा सांगितला. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. स्वागत अध्यापिका आरती पोवार यांनी केले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी एकूण ८०५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. ॲड सोनाली मगदूम यांनी नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. सचिन निटवे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापिका शितल डवरी यांनी काम पाहिले तसेच आभार अध्यापिका मनीषा सोनलकर यांनी मानले.