श्री शिवनेरी सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची निवडणूक बिनविरोध

विनायक वासुदेव पाटील चेअरमन पदी तर व्हाईस चेअरमन भिकाजी राजाराम पाटील

अतिग्रे : संतोष कांबळे

येथील श्री शिवनेरी सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली. सन 20-25 ते 20-30 या पंचवार्षिक कालावधी करिता ही निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल चिकणे यांनी काम पाहिले.
या वेळी सखाराम गोपाळ मुसळे, महादेव ज्ञानू पाटील, सचिन महादेव चौगुले,अवधूत अशोक चौगुले,सौ लता मारुती गायकवाड,श्रीमती वैशाली आनंद पाटील यांची संचालक पदी निवड करण्यात आली. तर सचिव पदी पुंडलिक बालकृष्ण पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी सरपंच पांडुरंग पाटील, ऍड चिंतामणी कांबळे,माजी उप सरपंच संदीप सूर्यवंशी,माजी उप सरपंच बाबासाहेब पाटील, दादासो चौगुले,प्रकाश सूर्यवंशी,मारुती गायकवाड,वासुदेव पाटील, दीपक मणगुत्ते,अमोल पाटील, शशिकांत पाटील,अमर पाटील, संदेश चौगुले,शुभम चौगुले,अमर पाटील,सुदय चौगुले, विजय पाटील,बाबासो शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.