डॉ.जे.जे.अभियांत्रिकी महाविद्यालय : छ.शिवाजी महाराज जयंती उत्साहात

Loading

शिवमय बनले जयसिंगपूर

जयसिंगपूर : प्रतिनिधी-

येथील डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. महाविद्यालयासह अख्खे शहर या निमित्ताने शिवमय बनले. क्रांती चौक ते महाविद्यालय या मार्गावर भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये छ. शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अश्वारूढ सहभागी झाले. तर पालखीमध्ये शिवराय विराजमान होते. विद्यार्यांनी ठिकठिकाणी पथनाट्य सादर केली. समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न या पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त युद्धकलेची प्रात्यक्षिकही झाले. या जबरदस्त अशा जयंती सोहळ्यास नागरिकांनी भरघोस अशी दाद दिली.

महाविद्यालयात शिव प्रतिमेचे पूजन संस्थेचे चेअरमन डॉ. विजय मगदूम यांचे हस्ते झाले. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, डीन-स्टूडेंट प्रा. पी. पी. पाटील, सर्व विभागाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे यशस्वी आयोजन व नियोजन एन. के. पुजारी आणि सहकाऱ्यांनी केले.