![]()
यड्राव : प्रतिनिधी
यड्राव जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आम्ही घेतली असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे नक्कीच यापुढेही या मतदारसंघाचा कायापालट करू अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
यड्राव जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार रंजना कोळी, पंचायत समितीचे उमेदवार प्रतिक पाटील, शिरढोण पंचायत समितीचे उमेदवार मनिषा कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ यड्राव येथे करण्यात आला, यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते,
याप्रसंगी पुढे बोलताना यड्रायव्हर म्हणाले, मतदारसंघाचा विकास साधत असताना प्रामुख्याने सर्वच समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही विकासाच्या माध्यमातून केले आहे. जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन राजर्षी शाहू विकास आघाडी काम करीत आहे. या विकासाच्या मुद्द्यावरच शाहू आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जरा शाहू आघाडीचे उमेदवार निवडून आले तर विकासाची गती यापुढे देखील वाढेल व या मतदारसंघाचा मोठा विकास होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रकाश पाटील टाकवडेकर, सरपंच सत्तेंद्रराजे नाईक निंबाळकर, कुणालराजे नाईक निंबाळकर, शिवाजी दळवी, महावीर पाटील, सरदार सुतार, तुषार सुलतानपुरे, विनोद पाटील, प्रकाश अकिवाटे, अनिल स्वामी, दादा दानोळे, यशवंत पाटील, अभिराज पाटील, भिमगोंडा पाटील, महादेव पाटील, चंद्रकांत मोरे, दिलीप पाटील, अक्षय पाटील, शक्ती पाटील, बाबुराव कोईक, कलप्पा कोईक, रावसाहेब यमकनमर्डे यांच्यासह राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
