![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेचे विद्यमान संचालक औरवाड येथील काँग्रेस पक्षाचे माजी लोकनियुक्त सरपंच अशरफ पटेल व माजी पंचायत समिती सभापती कमरुद्दीन पटेल यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शाहू आघाडीत प्रवेश केला.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी आमदार उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी बोलताना माजी सरपंच अशरफ पटेल व कमरुद्दीन पटेल यांनी आमदार यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास झाला असल्याचे सांगितले. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच ग्रामीण विकासाच्या विविध योजनांमुळे तालुक्याचा चेहरामोहरा बदलत असून हा विकास पुढे अविरत सुरू राहावा, यासाठीच आपण शाहू आघाडीत प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ राजकारण नव्हे तर सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारे नेतृत्व म्हणून आमदार यड्रावकर यांच्यावर विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी साहेबपाशा पटेल, मुस्ताक पटेल, लतीफ पटेल, लीडर रशीद पटेल, अशपाक चौगुले, नियाज अहमद पटेल (कडते), जमीर पटेल, पापा पटेल, महेश कांबळे, महेश रावण, मजीद हवालदार, सौरभ पटेल, प्रल्हाद कांबळे, मुजाहिद पटेल, शौर्य आलम पटेल, अबिद पटेल, कदिर देसाई, मतीन पटेल, लियाकत अली पाटील, सरफराज पटेल, शाहरुख पटेल, तोफिक पटेल, आयान पटेल, सुनील कांबळे,
दस्तगीर शेख या कार्यकर्त्यांसह सहित पटेल अफसर पटेलशफी पटेल, सुकुमार किनिंगे, आनंदा कुंम्मे, सचिन दानोळे, आदिनाथ आरबाळे, प्यारे साहेब साहेबवाले, अबू शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रवेशामुळे शिरोळ तालुक्यात राजर्षी शाहू विकास आघाडीची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उपस्थित कार्यकर्त्यांनी आमदार यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
