जयसिंगपूर पोलिसांची चमकदार कामगिरी

जयसिंगपूर पोलिसांची चमकदार कामगिरी

Loading

गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना दिले परत

जयसिंगपूर : प्रतिनिधी

 जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आठवडा बाजार, गर्दीचे ठिकाणावरून गहाळ झालेले विविध कंपन्यांचे 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे 20 अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत देण्यात आले आहे. त्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदार ताहिर मुल्ला, रहिमान शेख, बाळासाहेब गुत्ते कोळी आणि सायबर पोलीस ठाणे कडील अमर अडसुळे यांनी तपास करून आयएमईआय नंबरच्या पुराव्यावरून वेळोवेळी पाठपुरावा करून जयसिंगपूर शहर तसेच महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि कर्नाटक राज्यात तपास करून गहाळ झालेले मोबाईल वापर करत असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन 20 अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करून दिलेल्या माहितीवरून बुधवार दि. 21 रोजी सकाळी 11.30 वाजता जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे मूळ मालकांना बोलावून कागदपत्रे तपासून पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या हस्ते सदरचे अँड्रॉइड मोबाईल्स  परत देण्यात आले आहेत.