शाहू आघाडीने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शिरोळ मधील सर्व जागांवर दिले उमेदवार

Loading

विकास कामांमुळे शाहू आघाडीला मोठे यश मिळणार

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महायुती मधील सर्व घटक पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व ७ व पंचायत समितीच्या सर्व १४ जागांवरती सर्वमान्य उमेदवारांना संधी देताना अनेक नवीन चेहऱ्यांना न्याय दिला आहे,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तालुक्यातील प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी गेली आठ दिवस यड्रावकर चेंबर्स येथे मोठी गर्दी केली होती, इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन स्थानिक नेते मंडळी व इच्छुकांशी चर्चा करून सर्वांना विश्वासात घेऊन सर्वमान्य उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केला असल्याने नाराजीचे प्रमाण राहणार नाही, महायुती मधील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच राजर्षी शाहू आघाडीचे कार्यकर्ते एक दिलाने या निवडणुकीला सामोरे जातील महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या सहा सात वर्षात तालुक्याच्या प्रत्येक जिल्हापरिषद मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन भरीव विकास कामे केली आहेत त्यामुळे या निवडणुकीत शाहू आघाडीला मोठे यश मिळेल अशी माहिती शाहू आघाडीचे नेते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी दिली.