![]()
तरुणाचा मृत्यू : एकाविरुद्ध गुन्हा नोंद

जयसिंगपूर : प्रतिनिधी
कोल्हापूर – जयसिंगपूर महामार्गावरील चौंडेश्वरी फाटा येथे स्टार लॉन्ससमोरील रस्त्यावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात विशाल राजेंद्र ठोमके (वय २५) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी संदिप परशुराम कांबळे (रा. तेरदाळ, ता. हातकणंगले) याच्याविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची मोहन बबन कदम (वय २३, रा. गल्ली नंबर ५, चिंचवाड, ता. शिरोळ) यांनी फिर्याद दिली आहे.
रविवार, दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी सव्वाआठच्या सुमारास विशाल ठोमके हे आपल्या मोटारसायकल क्रमांक MH 09 FU 7808 वरून कोल्हापूरहून जयसिंगपूरकडे जात असताना संशयित आरोपी संदिप कांबळे याने त्याची मोटारसायकल क्रमांक MH 09 BU 4215 भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून अपघात घडवून आणला. या अपघातात विशाल ठोमके यांचा मृत्यू झाला.घटनेचा पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत