![]()
खिद्रापूर : अभिनंदन सुनके

सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची मोर्चेबांधणी गतिमान होत असून सर्व स्तरावर अनेक नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. टाकळी पंचायत समिती मतदार संघासाठी देखील प्रत्येक गावांमधून अनेक नावे चर्चेत असतात. स्वातंत्र्य काळापासून ऐतिहासिक व पर्यटनासाठी जगभर प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या खिद्रापूर या गावाला तालुका पंचायत अथवा जिल्हा परिषद यासाठी एकदा ही संधी मिळाली नाही अनेक मातब्बर नेते या गावात होऊन गेले मात्र लोकसंख्येने कमी असलेले गाव असे संबोधून प्रत्येक वेळी उमेदवारी नाकारण्यात आली मात्र सध्या परिस्थितीत गावची लोकप्रियता पाहता व श्री कोपेश्वर राजा कृपादृष्टीने खिद्रापूर याबरोबरच परिसरातील गावांचा भरभराटीने विकास झाला. त्यामुळे या गावातील स्थानिक नेत्यांना उमेदवारी मिळणे ही गरजेचे आहे त्यामुळे या गावच्या विकासाबरोबर परिसरातील गावातील झपाट्याने विकास होऊ शकेल असा विश्वास व्यक्त होत आहे.
राजर्षी शाहू आघाडी कडून टाकळी पं. स. करिता ताहीर खान मोकाशी तर महाविकास आघाडी कडून संजय पाटील असे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.
यड्रावकर गटाकडून माजी लोकनियुक्त सरपंच यांचे सुपुत्र ताहीर खान मोकाशी, प्रगतशील शेतकरी सुरेश यड्रावे, गणेश नाटेकर,चेतन कदम, यांची यड्रावकर गटाकडून तर संजय उर्फ बसगोंडा पाटील, कुलदीप कदम, पंचाक्षरी कोष्टी, बस गोंडा पाटील यांची राष्ट्रीय काँग्रेस कडून सध्या नावे चर्चेत आहेत. पक्ष सर्वे ग्राउंड रिपोर्ट पाहता सदर उमेदवारांचा कौल चांगला ठरण्याची शक्यता आहे. माजी लोकनियुक्त सरपंच हैदर खान मोकाशी हे आपले काका वडील यांच्या आदर्श घेऊन समाज समाजसेवा अंगीकारून समाजसेवेबरोबर राजकारण सुरू ठेवून गावचा विकास हाच आपला सन्मान, कोणी साथ दे अगर ना दे एकला चलो रे हा नारा घेऊन त्यांनी आपल्या सरपंचकीच्या कार्यकिर्दित संघर्षातून मोठ्या प्रमाणात विकास करून गावच्या चेहरा मोहरा बदलला आहे. त्यामुळे या कार्यात त्यांच्या सुपुत्र ताहीर खान मोकाशी यांनी वडिलांच्या खांद्याला खांदा लावून काम केल्याने त्यास अनुभवाची जोड मिळाली आहे. शिवाय टाकळी मतदारसंघांमध्ये युवा वर्गामध्ये ताहीर यांचे वलय मोठे निर्माण झाले असून तहसील कार्यालयापासून मंत्रालय पर्यंत कामे कसे करून घ्यायचे याची हातोटी त्यांच्याकडे आहे. शिवाय रात्री अपरात्री कोणाचा दवाखाना असो मयत असो विद्यार्थ्यांच्या समस्या असो, मिस्ड कॉल अथवा एका फोन द्वारे ती तातडीने तिथे पोहोचतात, समस्या जाणून घेतात आपल्या परीने ते सोडवण्याचा प्रयत्न करतात.
आपल्याकडे शक्य झाले नसल्यास वरिष्ठ पातळीवर तर नक्कीच सोडवून घेतात ते यड्रावकर गटाचे कट्टर कार्यकर्ते असले तरीही तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्वच नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे तालुक्यातील व जिल्ह्यातील नेत्यांच्या यादीत प्रथम स्थान ताहीरखान मोकाशी यांना देण्यात आले आहे असे समजते तर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो असे समजून राजकारणात प्रवेश करून आमदार यड्रावकर यांचा पताका घेऊन कार्य करणारे सुरेश यड्रावे, तर बहुजनांचा चेहरा म्हणून तळागाळातील सर्वसामान्यांचे मनापासून काम करणारे गणेश नाटेकर व चेतन कदम यांचे नाव अग्रे भागी आहे. तर आपले वडील कै मलगोंडा पाटील व स्वर्गीय आमदार सा. रे. पाटील यांची विचारसरणी डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारे साखर कारखान्याच्या मार्फत अनेकांना रोजगार देऊन हक्काचे भाकरी मिळवून देणारे श्री दत्त साखर कारखान्याचे विद्यमान संचालक संजय उर्फ बस गोंडा पाटील यांचे नाव माजी गृहराज्यमंत्री सतीश उर्फ बंटी पाटील यांच्या यादीत प्रथम स्थानी आहे असे समजते.
तर यांचे शिष्य मयूर चे संजय पाटील यांचे घनिष्ठ संबंध असणारे यांचे नातेवाईक कुलदीप कदम तसेच सामाजिक कार्यात कायमच प्रथम स्थानी असणारे ग्रामपंचायतचे माजी सदस्य बस गोंडा पाटील आणि व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व सर्वधर्मसमभाव हा पताका खांद्यावरून प्रत्येकासाठी काम करणारा पंचाक्षरी कोष्टी यांच्याही नावाला सर्व स्तरातून पसंती दर्शविण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याशिवाय अनेक स्वयंभू नेते ही इच्छुक आहेत कोणी समाजसेवेसाठी, कोणी फक्त पदासाठी, कोणी आर्थिक मिळकतीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांना मध्यस्थीची गळ घातल्याचे चर्चा दबक्या आवाजात अपूर्ण राहिलेल्या पुलाखाली रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे समजते. मात्र नेत्यांनी एकनिष्ठता व कर्तव्याला प्राधान्य देऊन उमेदवारी निश्चित केल्यास पुढील वोट बँक काही निश्चित होणार. चुकीचा निर्णय घेऊन जनतेची इच्छा नसताना कायमस्वरूपी बाप बदलणाऱ्यांना उमेदवारी दिल्यास व जनतेला आपल्या निष्ठेपोटी व दबावपोटी मतदान करण्यास भाग पाडल्यास याचा विपरीत परिणाम भविष्यकाळात स्वतःवर होणार हेही तालुक्यातील व जिल्ह्यातील नेत्यांना विसरून चालणार नाही. कारण कायम विमानाला झेप घेताना जमिनीचा आधार घ्यावा लागतो ही जमीन म्हणजेच सर्व सामान्य मायबाप जनता आहे.
