![]()
पंजाब गुरु काशी विश्व विद्यापीठाच्या शिरपेचात सोनेरी तुरा

जयसिंगपूर : प्रतिनिधी-
पंजाब गुरु काशी विश्व विद्यापीठाच्या शिरपेचात सोनेरी तुरा रोवला गेला असून या शहरातील कु. तन्वी चंद्रकांत कुराडे हिने तलवारबाजी या खेळामध्ये अतिशय रोमहर्षक सामना खेळून सुवर्णपदक पटकाविले. राजस्थान (कोटा) मध्ये नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये जयसिंगपूर रेल्वे स्टेशन नजिक असलेल्या ग्रीन व्हॅली अपार्टमेंट स्थायिक असलेली विद्यार्थिनी कु. तन्वी चंद्रकांत कुराडे हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठातील खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी गुरुकाशी विद्यापीठाची कु. तन्वी कुराडे हिने ( अमृतसर पंजाबच्या ) गुरुनानक देव युनिव्हर्सिटीची खेळाडूसोबत तलवारबाजी या इव्हेंट मध्ये अंतिम सामना खेळला. या अंतिम सामन्यांमध्ये तन्वीने अप्रतिम, रोमहर्षक तलवारबाजीचा सामना खेळून सुवर्णपदक पटकावत गुरुकाशी विद्यापीठाच्या नावाबरोबर जयसिंगपूर शहराचे नावलौकिक केले आहे. त्यामुळे विविध स्तरातून तन्वी कुराडेवर अभिनंदनचा वर्षाव होतो आहे.
यापूर्वी सुद्धा कु. तन्वी हिने हिने पंजाब, जम्मू काश्मीर येथे ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्ण व रौप्य पदक पटकावले असून तिच्या या यशामागे तिची आई सुवर्णा आणि वडील चंद्रकांत कुराडे तसेच गुरुकाशी विद्यापीठाचे क्रीडा विभागातील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कु. तन्वी हिचे वडील सध्या जयसिंगपूर रेल्वे खात्यात पॉइंटसमन म्हणून सेवा बजावत आहेत. तन्वी सध्या गुरुकाशी विद्यापीठामध्ये वाणिज्य विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे.
