झेडपीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आणि प्रमुख नेत्यांची घालमेल सुरू

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी

राज्यभरातील महापालिकेच्या निवडणुका नंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची घालमेल सुरू झाली असल्याचे दिसते. शिरोळ तालुक्यातील नेते गणपतराव दादा पाटील आणि त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी साहेब त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील नेते मंडळींनी एकत्रितपणे मोट बांधली असून कोण कोणते मतदार संघ निवडणूक लढणार हे सुद्धा जाहीर केले.तरी या तालुक्याचे आमदार तथा माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासमोर कोणाचा टिकाव लागत नाही असे दिसत आहे. एकंदरीत यड्रावकर यांचे समोर शरणांगती पत्करल्याचे हे चित्र दिसत आहे.

जयसिंगपूर कुरुंदवाड या दोन्ही नगरपालिकेला राजनीतीचे डावपेच यड्रावकर यांचे सरस ठरले आहेत. त्याचबरोबर शिरोळ पालिकेमध्ये सुद्धा काही प्रमाणात डावपेच यशस्वी झाल्याचे दिसत आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील दोन महानगर पालीक्यांच्या निवडणुका होऊन निकाल सुद्धा लागला. त्यानंतर लगेचच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. आता झेडपी वरती सत्ता काबीज करण्याचे जुजबी डावपेच सुरू होत आहेत. मात्र शिरोळ तालुक्यामध्ये डावपेच राहिले बाजूला सर्व नेत्यांची यड्रावकरांसमोर शरणांगती दिसत आहे. येणाऱ्या काळामध्ये यड्रावकरांचा चक्रव्यूह कोणीही भेदू शकत नाही हेच स्पष्ट होईल.