जयसिंगपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी डॉ.सुभाष सामंत, कार्याध्यक्षपदी हुसेन शेख

जयसिंगपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी डॉ.सुभाष सामंत, कार्याध्यक्षपदी हुसेन शेख

Loading

उपाध्यक्षपदी संदीप आडसुळ, सचिव पदी संजय सुतार यांची एकमताने निवड

जयसिंगपूर : प्रतिनिधी

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज शानदार न्यूज चॅनलच्या कार्यालयात जयसिंगपूर प्रेस क्लबच्या नूतन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली.

  जयसिंगपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. सुभाष सामंत, कार्याध्यक्षपदी हुसेन शेख, उपाध्यक्षपदी संदीप आडसुळ, सचिवपदी संजय सुतार, सह सचिव रोहित जाधव तर खजिनदारपदी विजय धंगेकर  यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी रोटरी ट्रेड सिटीचे अध्यक्ष डॉ. अतिक पटेल तर राष्ट्रपती पारितोषिक विजेते हाजी मोहम्मद शफी पटेल ( गुरुजी ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  

प्रारंभी आद्यपत्रकार बाळशात्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सर्वानुमते नूतन पदाधिकाऱ्यांची नावे सुचविण्यात आली. कोणताही वाद, मतभेद न होता शांततापूर्ण वातावरणात ही निवड पार पडल्याने पत्रकार बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.या वेळी ज्येष्ठ, अनुभवी तसेच युवा सर्व उपस्थित पत्रकारांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष डॉ. सुभाष सामंत यांनी पत्रकारांच्या विविध समस्या, मानधन, सुरक्षितता, सामाजिक प्रतिष्ठा तसेच पत्रकारांच्या व्यावसायिक अडचणी सोडवण्याकरिता प्रेस क्लबच्या माध्यमातून एकत्रितपणे प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला. प्रेस क्लब अधिक सक्षम, संघटित आणि प्रभावी बनवण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी कार्याध्यक्ष हुसेन शेख यांनी जयसिंगपूर प्रेस क्लबच्या कार्याला सातत्य देण्याचा निर्धार व्यक्त करून पत्रकारांमध्ये एकोपा निर्माण करून प्रेस क्लबच्या माध्यमातून सकारात्मक आणि विधायक उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल असे सांगितले.
सभेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ.अतिक पटेल यांनी पत्रकारांनी एकत्र राहून संघटनेच्या माध्यमातून आपले प्रश्न मांडावेत, पत्रकारितेची विश्वासार्हता जपावी आणि समाजहिताच्या प्रश्नांवर निर्भीडपणे लेखणी चालवावी असे मार्गदर्शन केले. स्वागत प्रास्ताविक संजय सुतार यांनी केले.
यावेळी रतन शिकलगार, अख्तरहुसेन पटेल, सतिश मोटे, नामदेव भोसले,राजू सय्यद, विनोद पाटील, रविंद्र कांबळे, अजय सदामते ,कुणाल कांबळे, प्रा. प्रभाकर मोरे, राजू इनामदार, विवेक कांबळे, नवाज मुजावर, ईजाज पठाण, उपस्थित होते.