![]()
शिरोळ : प्रतिनिधी
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि शिरोळच्या वतीने शिरोळ तालुक्यातील आठ गावातील जमीन सुधारणा प्रकल्पास राष्ट्रीय ग्रामीण कृषी रोज डे अंतर्गत शेतकऱ्यांना 1कोटी 60 लाख इतके अनुदान मंजूर होऊन त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.

कारखान्यामार्फत सन 2016 पासून शिरोळ परिसरातली क्षारपड जमिनी क्षारमुक्त करण्याच्या प्रकल्पाची सुरुवात केली. या प्रकल्पातील शेडशाळ, अर्जुनवाड, कवठेसार, गणेशवाडी, कुटवाड, हासुर,औरवाड व बुबनाळ येथील शेतकऱ्यांना रुपये 1 कोटी 60 लाखाचे अनुदान प्राप्त झाले आहे. एकूण 1910 हेक्टर साठी 11.46 कोटी मंजूर होऊन एकूण 9.25 कोटी आतापर्यंत क्षारपड जमीन सुधारणा करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान रक्कम मंजूर होऊन मिळाली आहे. उर्वरित क्षारपड जमीन सुधारणा शेतकऱ्यांना 2.21कोटी रक्कम अद्याप मिळणार आहे. त्यामुळे श्री दत्त कारखान्याच्या वतीने क्षारपड मुक्तीचा श्री दत्त पॅटर्न शिरोळ व अन्य परिसरातील सुरू असलेल्या क्षारपड जमीन सुधारण्याच्या प्रकल्पाची खास करून राज्य व केंद्र शासनाने दखल घेऊन देशपातळीवरील नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून गौरवले आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची जमीन क्षारमुक्त होऊन त्या ठिकाणी ऊस,हरभरा, शाळू,फुलशेती इत्यादी पिके शेतकरी घेऊ लागले आहेत. या प्रकल्पात सुटका मोठा नीधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाकडून मिळालेल्या रुपये 1 कोटी 60 लाख रकमेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यामध्ये मोलाची साथ मिळाली आहे. तसेच शिरोळ तालुक्यातील शिल्लक असलेल्या क्षारपड जमीन सुधारणेसाठी नवे बळ मिळून शिरोळ तालुक्यातील संपूर्ण जमिनी क्षारमुक्त होतील अशी आशा आहे. सदरचे अनुदान प्राप्त होण्यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे अत्यंत मोलाचे सहकार्य मिळाले आहे. या प्रकल्पासाठी राष्ट्रीय मृदा संस्था व महात्मा फुले कृषी विद्यापीठ व संशोधन केंद्र कसबे डिग्रज यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.क्षारपड मुक्त जमिनीचा श्री दत्त पॅटर्न या प्रकल्पासाठी डॉ. अप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेचे चेअरमन व सर्व संचालक तसेच श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन सर्व संचालक मंडळ कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील,मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना, ऊस विकास अधिकारी ए एस पाटील,प्रकल्पाचे प्रोजेक्ट इंजिनियर कीर्तीवर्धन मरजे,सुदर्शन तकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.