तर जिल्हात आंदोलन तीव्र करू : विजय भोजे यांचा सरकारला खणखणीत इशारा

Loading

शिरोळ : प्रतिनिधी
निवडणुकीत आरक्षण टाकायचं मात्र अनुसूचित जमातीचे आणि सर्व कोळी जमातीला दाखले, सवलती द्यायच्या नाहीत ही दुटप्पी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. यावर सकारात्मक भूमिका महिन्याभरात घेतली नाही तर शिरोळ तालुक्यातून तीव्र आंदोलनाची ठिणगी पडेल.असा खणखणीत इशारा कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष विजय भोजे यांनी सोमवारी शिरोळ तहसील कार्यालयात दिला.तर नागपुरात कोळी समाजावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध व्यक्त केला.
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी कोळी, महादेव कोळी, डोंगर कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, कोळी ढोर, अनुसूचित जमातीमधे खरे खोटे असा दूजाभाव केला जात आहे. याला वाचा फोडण्यासाठी नागपुर अधिवेशन दरम्यान सर्व कोळी जमातीने मोर्चा नेला होता. या कोळी समाजातील सुरू असलेल्या शांतता मोर्चात महिला आंदोलक असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला.फरफट नेले तसेच निवेदन स्वीकारण्यास कोणीही आले नाही. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील संतप्त झालेले कोळी बांधव सोमवारी जिल्हाध्यक्ष विजय भोजे यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नागपुरात झालेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. तर आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन तीव्र करणार असा इशारा जिल्हाध्यक्ष विजय भोजे यांनी दिला.

यावेळी आमच्या मागण्या मान्य करा, लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस प्रशासन, शासनाचा निषेध असो अशा घोषणा दिल्या. तद्नंतर तहसीलदार अनिल हेळकर यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून सदर आंदोलकांची मागणी शासनाला कळवू असे सांगितले.यावेळी सरचिटणीस रमेश कोळी शिरढोण, बाबासाहेब वनकोरे, भगवान कोळी, दिलीप कोळी शेडशाळ, शुभांगी कोळी, सुवर्णा कोळी, अनिता कोरे, रेखा बेडक्याळे, तानाजी कोळी, आदी उपस्थित होते.