जयसिंगपुरात १४ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी

शहरातील क्रांती फाउंडेशनच्यावतीने १४ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या शहर व परिसरामध्ये रक्तपेढीत रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून हा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा क्रांती फाउंडेशनच्या वतीने गली नंबर ९ मर्चंट असोसिएशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन डिसेंबरला मतदान झाले आता १४ डिसेंबरला रक्तदान करूया असा संदेश क्रांती फाऊंडेशनच्यावतीने
देण्यात आला असून शहर व परिसरातील सर्व सामाजिक व गणेशोत्सव मंडळे, तरुण मंडळे, सेवाभावी संस्था, युवा वर्गानी मोठ्या प्रमाणात या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासावी असे आवाहन क्रांती फाऊंडेशनच्या वतीने केले आहे.