![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी

जैनापूर ता शिरोळ येथील शरद कृषी महाविद्यालयातील सहा खेळाडूंची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या संघात निवड झाली आहे. राज्यस्तरीय होणाऱ्या २७ वी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव (अश्वमेध) २०२५-२६ ही स्पर्धा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे होत आहे. राष्ट्रीय खेळाडू कु. प्रगती संतोष कर्नाळे हिची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या संघाच्या ध्वज संचलन करण्याचा बहुमान मिळाला. राहुरीच्या संघामध्ये कु. प्रगती कर्नाळे ही संघाची कर्णधार (खो-खो), रत्नम गौडाजे (खो खो), वैभव शिंदे (बास्केटबॉल), कु. श्रुती शिंदे (बास्केटबॉल), प्रज्ञा अकिवाटे (हॉलीबॉल), आदित्य खिलारे (बुद्धिबळ), तसेच प्रा. दादासाहेब मगदूम यांची व्हॉलीबॉल मुलांच्या संघाचे कोच व मुलींच्या संघाकडे टीम मॅनेजर म्हणून निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थी व प्राध्यापक यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सारिका कोळी, उपप्राचार्य प्रा. संजय फलके, क्रीडा शिक्षक दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.