दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघात विकास कामांचा धडाका

Loading

आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून मतदार संघात १८९ कोटी ५० लाखांचा विकास निधी

जयसिंगपूर : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघातील विविध गावांसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून तब्बल १८९ कोटी ५० लाख रुपयांचा विकास निधी मंजूर होऊन अनेक महत्त्वाची कामे मार्गी लागली आहेत. खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पर्यटन स्थळाचा विकास करणे, रस्ते, नळ पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, समाज हॉल, सांस्कृतिक सभागृह, पानंद रस्ते, मंदिर परिसर सुशोभीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये हा निधी खर्च होत असून मतदार संघाचा सर्वांगीण विकास वेगाने पुढे जात आहे.
दत्तवाडसाठी २९ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामासाठी १६ कोटी रुपये, बौद्ध विहारासाठी ५० लाख, गांधी चौक ते सदलगा वेस रस्ता व आरसीसी गटर्ससाठी १ कोटी ५० लाख, कळम्मवाडी वसाहत ते ग्रामीण रुग्णालय दरम्यान आरसीसी गटर्ससाठी ३ कोटी, दलित वस्ती अंतर्गत रस्ते व गटारीसाठी १ कोटी ५० लाख, गांधी चौक–हायस्कूल काँक्रीट रस्त्यासाठी ५० लाख, व्यायामशाळा बांधकामासाठी २२ लाख, नळ पाणीपुरवठ्यासाठी ९३ लाख, अल्पसंख्यांक समाजासाठी काँक्रीट रस्ते ४० लाख आणि गावातील विविध रस्ते व पानंद रस्त्यांसाठी २ कोटी ५० लाखांचा निधी वापरला जात आहे.
घोसरवाड गावासाठी ६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. नळ पाणीपुरवठा योजना १ कोटी २८ लाख, शाळा खोली बांधकाम व दुरुस्ती ६५ लाख, गावांतर्गत रस्त्यांसह आयुर्वेदिक दवाखाना दुरुस्ती, बौद्ध समाज मंडप इत्यादी कामांचा यात समावेश आहे.
टाकळीवाडीमध्ये ७ कोटी ७५ लाख रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. नळ पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी ८७ लाख, रेणुका मंदिर खुले सभा मंडप, सैनिकी हॉल, मुस्लिम समाज दफनभूमी संरक्षक भिंत, कै. बाळासाहेब माने सभागृह नूतनीकरण, बिरदेव व विठ्ठल मंदिर मंडप तसेच गावातील रस्ते व गटारी यांचा समावेश आहे.
नवे दानवाड गावासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नळ पाणीपुरवठा २ कोटी ३४ लाख, ग्रामपंचायत इमारत २५ लाख, जुन्या इमारतीचे नुतनीकरण २५ लाख, मराठी शाळा ते बिरदेव मंदिर आरसीसी गटार ८० लाख, स्मशानभूमी सुशोभीकरण, लक्ष्मी मंदिर–माळी वस्ती रस्ता १ कोटी १८ लाख, मुस्लिम समाज इदगाह मैदान भिंत, आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती, गणेश मंदिर सभागृह, दलित वस्तीतील रस्ते–गटारी १ कोटी ५० लाख, दड्डी रस्ता १ कोटी तसेच इतर पानंद रस्ते व शाळा दुरुस्तीची कामे यात समाविष्ट आहेत.
जुने दानवाडसाठी ८ कोटी ६५ लाख रुपये देण्यात आले आहेत. नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ६७ लाख, लिंगायत समाज महादेव मंदिर सभागृह ३३ लाख, स्मशानभूमी रस्ता १ कोटी, दतवाड–दड्डी रस्ता ८० लाख, संगम रस्ता ९० लाख, कुमार विद्यामंदिर दुरुस्ती, मुस्लिम समाज सांस्कृतिक हॉल, जैन समाज सांस्कृतिक हॉल, तलाठी कार्यालय बांधकाम, पानंद रस्ते इत्यादी कामांचा यात समावेश आहे.
टाकळी गावासाठी १६ कोटी रुपयांची विकासकामे करण्यात येत आहेत. नळ पाणीपुरवठा ३ कोटी ५२ लाख, संभाजीनगर–खिद्रापूर रस्ता व गटर्स ८ कोटी, मातंग समाज हॉल, म्हसोबा देवालय सांस्कृतिक हॉल, तलाठी कार्यालय, पुलाकडे जाणारा रस्ता, वाल्मीक कोळी समाज हॉल, पिकप शेड, पानंद रस्ते यांसाठी हा निधी देण्यात आला आहे.
राजापूर गावासाठी ७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नळ पाणीपुरवठा १ कोटी २० लाख, उर्दू व मराठी शाळा बांधकाम व दुरुस्ती ८० लाख, हनुमान मंदिर सभागृह २५ लाख, तलाठी कार्यालय १५ लाख, मुस्लिम समाज सभागृह, आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती, दलित वस्ती रस्ते–गटारी आणि पानंद रस्ते अशा विविध कामांचा समावेश आहे.
राजापूरवाडी गावासाठी २ कोटी ७ लाख निधी मिळाला आहे. वाढीव नळ पाणीपुरवठा २८ लाख, राजापूरवाडी–खिद्रापूर रस्ता ८० लाख, पिकप शेड, गावांतर्गत रस्ते–गटारी, पानंद रस्ते अशा कामांसाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे.
पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी तब्बल ११२ कोटी रुपये देण्यात आले आहेत. मंदिर परिसर संवर्धन, घाट बांधणी, शौचालय बांधकाम, परिसर काँक्रीटीकरण, पर्यटन विकासासाठी ३ कोटी ३६ लाख, उर्दू शाळा वर्गखोल्या, मुस्लिम समाज दर्गा परिसर सुशोभीकरण, दलित वस्ती रस्ते व गटारी यांसाठी अतिरिक्त ८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
एकूण १८९ कोटी ५० लाख रुपयांचा विकास निधी देऊन दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघातील प्रत्येक गावाचा विकास साधण्यात आला आहे. या कामांमुळे संपूर्ण मतदार संघात पायाभूत सुविधा मजबूत झाल्या असून या भरीव निधीतून दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघाचा कायापालट होत आहे.