![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
शहरात कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे मार्गी लावल्याचा विश्वास नागरिकांना देत आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांनी मतदारांशी संवाद साधताना या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडीचा विजय निश्चित आहे, मागील पाच वर्षांत जयसिंगपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आम्ही केले आहे, त्यामुळे विकासाच्या मुद्यावर राजर्षी शाहू विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे, असे मत राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले.
प्रभाग क्रमांक ११ मधील प्रचारफेरी दरम्यान मतदारांशी संवाद साधताना संजय पाटील यड्रावकर यांनी शहरातील नळ पाणीपुरवठा, रस्ते, लाईट, स्वच्छता, क्रीडा सुविधा, शैक्षणिक सोयी, महामानवांचे पुतळे उभारणे, भुयारी गटार योजना, सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण, नवीन प्रकल्पांची अंमलबजावणी या सर्व क्षेत्रांत आघाडीने केलेल्या कामांचा आढावा घेतला. राजर्षी शाहू विकास आघाडीने जयसिंगपूर शहराचा विकास हेच ध्येय ठेवून कामे केली आहेत. शहराचा कायापालट करण्याचे आमचे स्वप्न असून त्याची पूर्तता करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. येणाऱ्या काळातही ही विकासगंगा वेगाने सुरू राहील, असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला.
या प्रचारफेरीत प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार लक्ष्मण कलकुटगी व गीता संतोष भोसले हेही संजय पाटील यांच्यासह नागरिकांच्या भेटीगाठीस उपस्थित होते. प्रभागामध्ये उमेदवारांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. विशेषतः महिलांनी औक्षण करून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. नागरिकांनी मोकळेपणाने आपले प्रश्न व सूचना सांगितल्या. सर्व समस्यांचे वेळेत निराकरण करून प्रभागाचा दर्जा उंचावण्याचे आश्वासन उमेदवारांनी मतदारांना दिले.
प्रत्येक प्रभागात मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता राजर्षी शाहू विकास आघाडीचा विजय निश्चित आहे. केलेली कामे, विकास आणि नागरिकांचा विश्वास या तिन्ही आधारस्तंभांवर निवडणूक लढवीत आहोत, असेही संजय पाटील यड्रावकर यांनी सांगितले. मतदारांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा पाहता आघाडीची प्रचार मोहीम अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
या प्रचार फेरीला सावकार मादनाईक, संभाजी मोरे, शितल गतारे, प्रमिला मुरगुंडे, ॲड.प्रसाद नाईक मिलिंद भिडे, रमेश यळगुडकर, शिवाजी कुंभार, सुभाष मुरगुंडे, रतन पडियार, सुहास शिरढोणे, संजय सारस्वत,राजेश मालू, संजय कुलकर्णी, चेतन चौधरी, सुनील बंडगर, सचिन देशिंगे, प्रवीण देसाई, निवास वडर, अशोक कलकुटगी, सुजाता कलकुटगी, पूजा गाडीवडर, दीपा पाथरवट यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
