![]()
कुरुंदवाड : प्रतिनिधी


महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यातून व श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा प्रमुख मार्ग ९२ वरील मजरेवाडी पेट्रोलपंप ते श्री गुरुदत्त साखर कारखाना या मार्गावरील रस्ता क्रॉक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून वाहनाची वाहतूक सुरू झाली आहे. या रस्ता क्रॉकिटीकरण कामामुळे वाहतूक सुकर झाली असून शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच गुरुदत्त कारखान्याकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पावसामुळे व अवजड वाहनामुळे डांबरीकरण झालेला हा रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडून रस्ता खचला होता. त्यामुळे हा रस्ता चांगला व्हावा यासाठी नागरिकांनी श्री गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्याकडे मागणी केली होती. श्री घाटगे यांनी या रस्त्याच्या कामाबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. महाराष्ट्र राज्याच्या सन २०२४-२५ अर्थ संकल्पामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग (प्रजिमा) -९२ मजरेवाडी पेट्रोलपंप ते गुरुदत्त साखर कारखाना हा रस्ता साडेसात मीटर रुंदीने काँक्रिटीकरण करणे या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.मागील दोन महिन्यांमध्ये या रस्त्याचे काम सुरू होऊन हा रस्ता पूर्ण झाला आहे. सध्या या रस्त्यावरून वाहनांची वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.
काम नियोजित वेळेत पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांनी व वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे यांचे आभार मानले

