![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
कुरुंदवाड शहरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला असून, संघटनेचे युवा शहराध्यक्ष किरण दत्तात्रय गावडे यांनी यड्रावकर गटात प्रवेश करून कुरुंदवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार यड्रावकर यांच्याबरोबर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
किरण गावडे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सक्रिय, तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. संघटनेत त्यांनी मोठे काम केले होते. मात्र, अलीकडच्या काळात झालेल्या राजकीय घडामोडींमुळे त्यांनी स्वाभिमानीची साथ सोडत यड्रावकर गटात जाहीर प्रवेश केला.
दरम्यान शिरोळ तालुक्यात सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला असल्याने तिन्ही नगरपालिकेत शाहू आघाडीची बाजू भक्कम झाली आहे.
या प्रसंगी रमेश भुजुगडे, उमेश कर्नाळे, रणजीत डांगे, अथर्व भूजुगडे, संजय नांदणे, अजित उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
