![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी

डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट संचलित अनिल उर्फ पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज, धरणगुत्ती येथे दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रॅम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ. प्राजक्ता देशपांडे (QA/QC मॅनेजर, एस. जी. फायटो फार्मा प्रा. लि., कोल्हापूर) या उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील संधी, उद्योगातील गुणवत्ता नियंत्रणाचे महत्त्व, तसेच व्यावसायिक प्रगतीसाठी लागणाऱ्या कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले.
ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम व व्हाईस चेअरपर्सन ॲड. डॉ. सौ.सोनाली मगदूम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी, नैतिक मूल्ये आणि आत्मविकासाचे महत्त्व पटवून दिले.
विद्यार्थ्यांना त्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी योग्य दिशा मिळावी यासाठी ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ.सुनिल आडमुठे त्यांनी मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन निटवे यांन विद्यार्थ्यांना कॉलेजच्या शैक्षणिक अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, वार्षिक क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रम, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, तसेच करिअर मार्गदर्शन सत्रांची सविस्तर माहिती दिली.
इंडक्शन प्रोग्रॅमच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यापिका सौ.मनाली भिडे तसेच अध्यापिका कु.शितल डवरी, सर्व अध्यापक अध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.