धनशक्ती विरूध्द जनशक्ती : माजी खासदार राजू शेट्टी

धनशक्ती विरूध्द जनशक्ती : माजी खासदार राजू शेट्टी

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी

आमच्यासोबत वंचित आघाडी आणि आम आदमी हे पक्षसुद्धा सोबत येतील असा विस्वास माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला. महाविकास आघाडीसह समविचारी पक्ष आणि संघटनेच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आम्ही एकदिलाने एकजुटीने हि निवडणूक लढविणार असून जयसिंगपूर शहरातील प्रस्थापित लोकांना आता सुट्टी नाही असा खमका इशाराही त्यांनी दिला. शहरालगत जमीनीवर आरक्षण टाकून पैसे मिळवायचे हे धंदे सुरू आहेत असा आरोप करून त्यांनी हि निवडणूक धनशक्ती विरूध्द जनशक्ती असल्याचे स्पष्ट केले.

जयसिंगपूर : प्रतिनिधी-

भूयारी गटार योजना फसली असून जयसिंगपुरात नगरपालिका इमारत बांधकाम, लाईट घोटाळा बाहेर निघत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर जयसिंगपूर शहरातील रस्त्यांची अवस्था बघता विकासाचा डोंगर दुर्बिण घेवून शोधण्याची गरज असल्याची खंतही राजू शेट्टी यांनी आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचे नाव न घेता व्यक्त केली. तर गणपतराव पाटील यांची मला साथ असून जिल्हा परिषद असो नगरपालिका एकदिलाने लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी विधानपरिषदेचे गटनेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आम सतेज ऊर्फ बंटी पाटील, दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील,अनिलराव यादव,चंगेजखान पठाण,पृथ्वीराज यादव, रावसाहेब भिलवडे, वैभव उगळे, स्वाती सासने, डॉ. महावीर अक्कोळे, सर्जेराव पवार, अशोक कोळेकर, युनूस डांगे, नितीन बागे, गुंडाप्पा पवार,संतोष जाधव,कॉम्रेड रघुनाथ देशिंगे विश्वजित कांबळे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते