![]()
नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ : नामदार प्रकाश आबिटकर अध्यक्षस्थानी

आजरा : प्रतिनिधी
येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा 27 व्या गळीत हंगाम शुभारंभाचे मोळी पूजन नाम. हसन मुश्रीफ यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थान नाम. प्रकाश आबिटकर होते. वरूणराजाच्या साक्षीने हा कार्यक्रम पार पडला. पावसाची रिपरिप असल्याने कार्यक्रम मंडपात घेता आला नाही ऐनवेळी हा कार्यक्रम कारखान्याच्या बिल्डिंगमध्ये घ्यावा लागला.
सर्वप्रथम काटा पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे संचालक अनिल फडके व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अनिता फडके यांच्या हस्ते झाला. स्वागत कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी केले. कारखाना चालवताना येणाऱ्या अनंत अडचणीचा आढावा त्यांनी घेतला. तसेच संकेश्वर बांदा महामार्गावरील टोलनाका रद्द करण्याबाबत, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याबाबत आणि कारखान्यासाठी सहप्रकल्प उभारण्यासाठी मदतीचे आवाहन दोन्ही नामदारांना केले.
याच प्रश्नांचा धागा पकडत नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की, कारखानदारी वाचवायची असेल तर ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचे एकरी उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. कारखानदारीत स्पर्धा वाढली आहे. 100 दिवसांवर गळीत हंगाम येऊन ठेपला आहे यावर्षीही 100 दिवसांचाच गाळप हंगाम होणार आहे. त्यामुळे भविष्यात गाळप दिवस वाढवायचे असतील तर एकरी उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. ठिबक सिंचनाचा वापर करून किमान 100 एकरावर ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. प्रेसमड, स्पेन्टवॉश पासून सी. एन.जी प्रकल्प, सोलर प्रकल्प असे सह प्रकल्प उभे करण्यासाठी प्रयत्न करू. असे आश्वासनही त्यांनी दिले. टोल बाबत बोलताना किमान 15 किलोमीटर पर्यंत टोल बाहेर नेण्यासाठी प्रयत्न करू. वन्यप्राण्याबाबतही उपाय काढू. 4 लाख मे.टन गाळप करून तोटा कमी करण्यासाठी गाळप आणि उत्पादन वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात नाम. प्रकाश आबिटकर यांनी कारखान्याच्या अडचणी सर्वांनी मांडल्या. स्पर्धा आहे. शेतकऱ्यांपर्यंत पोहचून संपूर्ण ऊस गाळपासाठी आणणे गरजेचे आहे. आजरा तालुका सहकाराचे वैभव आहे. निवडणूकीवेळी राजकारण असावं परंतु विकासाच्यावेळी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. असे स्पष्ट केले. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्नशील असून हत्तीसंगोपन केंद्र सुरु करू असे आश्वासन देत यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा असे आवाहन केले. घाटकरवाडीच्या पुढे टोलनाका नेण्यासाठी प्रयत्न करणार असून यासाठी केंद्रीय परीवहन मंत्री गडकरी यांचेशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक सुधीरभाऊ देसाई यांनी कारखाना बंद पडल्यानंतर तसेच प्रत्येक अडचणीवेळी मुश्रीफ साहेबांनी मदत केली अशी कृतज्ञता व्यक्त करीत प्रत्येक वेळी ते मदतीला धावून येतात. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गण कमी झालेत पुढे जाऊन स्वीकृत सदस्य घेणार असे समजते. तेव्हा शासनाचा जी. आर. निघाला तर आजऱ्याचा प्रधान्याने विचार व्हावा असेही ते म्हणाले.
यावेळी व्हा. चेअरमन सुभाष देसाई, ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर, वसंतराव धुरे, उदयदादा पवार, मारुती घोरपडे, एम. के देसाई, रणजीत देसाई, शिवाजी नांदवडेकर, राजू जोशीलकर, हरिभाऊ कांबळे, दीपक देसाई, राजू मुरुकटे, संभाजी पाटील, गोविंद पाटील, अशोक तर्डेकर, रशीद पठाण, नामदेव नार्वेकर, दिगंबर देसाई, सौ. रचना होलम, सौ. मनीषा देसाई, अबूताहेर तकीलदार,राजेंद्र सावंत, विठ्ठलराव देसाई, दौलत पाटील, अनिकेत कवळेकर, जितेंद्र भोसले, विजय थोरवत, इंद्रजित देसाई, रियाज तकीलदार,आलम नाईकवाडे,कार्यकारी संचालक संभाजी सावंत, मुख्यशेतीधिकारी विक्रमसिंह देसाई,अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी,सभासद, वाहतूकदार, कंत्राटदार आदिजण उपस्थित होते.
सूत्रसंचलन रमेश देसाई यांनी केले तर आभार संचालक काशिनाथ तेली यांनी मानले.
