![]()
आजरा : प्रतिनिधी
आजरा महाविद्यालय मधील इयत्ता अकरावी विज्ञान मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी श्रेया संजय पाटील हिने चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला. कोल्हापूर शाही दसरा 2025 अंतर्गत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते कु श्रेया हिला गौरविण्यात आले. यावेळी वर्गशिक्षक रवींद्र मस्कर व पालक उपस्थित होते.
कु. श्रेया हिस जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांची प्रेरणा व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक सादळे, उपप्राचार्य दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक मनोज कुमार पाटील, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. कु. श्रेया हिस वर्गशिक्षक रवींद्र मस्कर व सौ. सुवर्णा धामणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
