![]()
मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे हस्ते 23 कोटीच्या पूलाचे भूमिपूजन

शिरोळ / प्रतिनिधी
गेली वीस वर्षे प्रलंबित असलेली अकिवाट आलास दरम्यानचा कृष्णा नदीवरील पूल उभारावा ही मागणी आता पूर्णत्वाकडे जात असून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते या पुलाचा भूमिपूजन समारंभ झाला. २३ कोटी रुपयांचे या कामाचे अंदाजपत्रक असून आलास अकिवाट या पुलामुळे शिरोळ तालुक्यातील जनतेचे दळणवळण सुलभ व जलद होणार आहे. तसेच वेळेची बचत होणार असा विश्वास यावेळी नामदार पाटील यांनी व्यक्त केला. श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी या पुलासाठी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ आज होत असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन माधवराव घाटगे यांनी “या पुलामुळे सात गावातील ग्रामस्थांना महापुराच्यावेळी गुरुदत्त शुगर्सच्या निवारा छावणीमध्ये जाण्यासाठी मदत होणार असून आलास- अकिवाट दरम्यान होणारा पुल २७० मीटर लांब आणि साडेसात मीटर रूंद होणार असल्याची माहिती दिली. यामध्ये ३० मीटरचे नऊ गाळे असून पुलाच्या दोन्ही बाजूला महापुरात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सहा- सहा मीटरची बॉक्स उभारले जाणार आहेत. त्यामुळे महापुराची पाणी वाढले तरी या बॉक्समधून पुराची पाणी सरळरित्या जाणार आहे. शिरोळ तालुक्यातील नदीपलीकडील सात गावांना अकिवाट, टाकळीवाडी,दत्तवाड या गावांना व कर्नाटक राज्यातील बोरगाव, सदलगा या भागाला जोडण्यासाठी हा पुल महत्वाचा ठरणार आहे.” असे सांगितले.
यावेळी धैर्यशील माने,गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य अरुणराव इंगवले, जि.प.चे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन – नाईक निंबाळकर, महेश देवताळे, डॉ. संजय पाटील, अन्वर जमादार, मुकुंद पुजारी, राजेंद्र दाईंगडे, रमेश यळगुडकर, आलासचे सरपंच सचिन दानोळे, उपसरपंच सोनाली कोळी यांच्यासह आलास,अकिवाट गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .