![]()
आजरा : प्रतिनिधी


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) गटाचा कार्यकता संवाद मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात सर्वानी एकत्रित आणि एकदिलाने काम करण्याचा निर्णय झाला. बुरुडे ता. आजरा येथे हा मेळावा झाला असून यावेळी विविध मान्यवरानी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सुरवात झाली. तर सूत्रसंचलन व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सूर्यकांत कांबळे यांनी केले. स्वागत आजरा सूतगिरणीचे संचालक शशिकांत सावंत यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे होते.
राष्ट्रीय उपाध्यक्ष दलितमित्र पी. एस. कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष आर. एस. कांबळे, तालुकाध्यक्ष भुदरगड बबन कांबळे, तसेच तालुका सरचिटणीस भुदरगड सुभाष कांबळे आदिनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आभार शंकर कांबळे यांनी मानले.
यावेळी दीपक जमणे (महावितरण सहाय्य्क अभियंता, आजरा), विष्णू कांबळे, मोहन कांबळे, महेश कांबळे, बाबुराव होन्याळकर, सुभाष तेंडुलकर, अविनाश कांबळे, भीमराव जोशीलकर, पांडुरंग बागवे, हणमंत जोशीलकर, तानाजी कांबळे, शशिकांत सावंत, संभाजी कांबळे, धर्मेंद्र कांबळे, अर्जुन बोलके यांच्यासह भीमराव तरुण मंडळ, रखवालदार तरुण मंडळ बुरुडे, भटवाडी तसेच आजरा तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.