![]()
शरद इंजिनिअरिंगमध्ये इम्पेटस २के२५ स्पर्धा, २६५१ विद्यार्थी सहभागी

यड्राव : प्रतिनिधी
करिअर करताना गुण महत्वाचे असतातच, पण त्यासोबत अनेक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. तरच या स्पर्धेच्या जगात आपला ठसा उमटवता येईल. भविष्यात आपण काय बनायचे आहे, हे आता पासून ठरवा; माहिती घ्या, विचार करा आणि त्या दिशेने वाटचाल करा. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या संधी येतात, त्या ओळखून त्या संधीचे सोने करा. असे प्रतिपादन जीआरआय टॉवरचे सिनिअर मॅनेंजर सुनिल परीट यांनी केले. ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आयोजित इम्पेटस २के२५ या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेच्या उदघाटन समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थीनी संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे होते.
ते पुढे म्हणाले, मातीशी म्हणजे आपल्या इतिहासाची निगडीत असलेला मनुष्य अयशस्वी होत नाही. त्याला सर्व परिस्थीतीची जाण असते. आव्हाने स्विकारा, संधी मिळतात. सत्कर्म करा, कर्माची म्हणजे कष्ट करा त्याचे फळ नक्कीच मिळेल.
अनिल बागणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी कशामध्ये आपले करिअर करायचे आहे हे आताच्या स्पर्धेच्या माध्यमातून लक्षात येईल. आपल्याला काय करायचे आहे, हे आतापासून आपल्या मनात रुजवायला हवे. विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची दिशा ठरवण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या ठरतात. सध्या चलनापेक्षा वेळ अधिक मौल्यवान आहे. या चार वर्षांच्या कालावधीत ज्ञान, तंत्रज्ञान आणि संभाषणकौशल्यांची पेरणी करा. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्र. प्राचार्य डॉ. बी.बी. संगमे यांनी मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा समन्वयत प्रा. पी. के. कर्वे यांनी स्पर्धेविषयी माहीती दिली. स्पर्धेत महाराष्ट्रसह इतर राज्यातून असे एकूण २६५१ विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी प्रथम वर्षसह सर्व विभागनिहाय पेपर प्रेझेंटेशन व प्रोजेक्ट स्पर्धा झाल्या. यावेळी तांत्रिक स्पर्धेमध्ये टेक्नीकल पोस्टर प्रेझेंटेशन, कोड स्नायपेट, जावा स्टॅकहॅक, कॅड मॅनिया, ग्रुप डिसक्शन, टेकक्वीझ, आयडिया नेशन, मेकएक्सप्लोअर, टेकस्पार्क, इनो बॅटल, माइंडक्राफ्ट, हॅकेथॉन, इलेक्ट्रो मॅनिया, फ्युजन मास्टर, पिक अॅण्ड प्लेस, सिव्हिल कॅन्वास, अपेक्स सर्वे चॅलेंज, वॉर ऑफ वर्ड व ग्रुप डिस्कशन असा विविध स्पर्धा झाल्या.
विजेत्यांना अडिच लाखांपेक्षा अधिक रकमेचे बक्षिस, प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचे आयोजन समन्वयक प्रा. पी.के. कर्वे यांच्यासह विभाग समन्वयक, डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले. सूत्रसंचालन श्रध्दा लठ्ठे, जेबा खाखु यांनी केले. आभार डॉ. एस.के. शिकलगार यांनी मानले.
फोटो ओळ- यड्राव येथे स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी सुनिल परीट, अनिल बागणे, बाहुबली संगमे, प्राध्यापक, विद्यार्थी आदी.