![]()
इच्छुकांच्या नशिबी भोपळाअनेकजण सुरक्षित मतदार संघाच्या शोधात


जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.८) रोजी प्रभाग आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे निश्चित करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांच्या उपस्थितीत प्रभाग आरक्षण प्रक्रिया सिद्धेश्वर यात्री निवास येथे पार पडली.
पालिकेसाठी बुधवारी (दि.८) प्रभाग आरक्षण निश्चितीनंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे. प्रभाग आरक्षण जाहीर झाल्याने आता आरक्षणानुसार उमेदवारांची चाचपणी युद्धपातळीवर सुरू झाली आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक हौशी मंडळींनी आपल्या आणि हक्काच्या प्रभागातच संधी मिळावी यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते. काहींना हक्काच्या प्रभागात संधी मिळाली असून काहींना सुरक्षित प्रभागाचा शोध घ्यावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर अनेकांच्या स्वप्नांना तडा गेला. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या उमेदवारांची नावे चर्चेत आली आहेत. अद्याप कोणीही मी लढवणार असे स्पष्टपणे जाहीर केले नसल्याने कोण लढणार की कुणाला संधी मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
बुधवारी सर्वसाधारण, अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षणाची सोडत निघाली. हरकतींचा पेच निर्माण झाल्यास यानंतर यावर सुनावणी होईल व २८ ऑक्टोबर रोजी निश्चित आरक्षणे अधिकृतपणे राजपत्रात प्रसिद्ध होणार आहेत. मतदार यादी कार्यक्रम आणि प्रभाग आरक्षण सोडतीमुळे पालिका निवडणूकीच्या हालचाली गतिमान झाल्या असून प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
१३ प्रभागासाठी २६ इतक्या उमेदवारांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. मुळातच गेल्या चार वर्षांपासून निवडणुका लांबल्याने पालिकेवर ‘प्रशासक राज’ सुरू होते. याकाळात कोणत्याही प्रभागात कोणतेही आरक्षण पडले तरी त्या त्या आरक्षणाच्या उमेदवारांची कच्ची यादी तयार करण्यात आली असून अशा उमेदवारांना प्रभागात तयारी करण्याचे आदेश संभाव्य नेत्यांकडून उमेदवारांना मिळाले होते.
गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या काळात इच्छुकांची बॅनरबाजी आणि देणग्यांसाठी हात ढिला सोडल्याने त्यांच्या नावाची चर्चा सुरूच होती. प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर मात्र काहींच्या तयारीचे मोल होणार आहे तर काहींना अन्य प्रभागात नव्याने जोडण्या कराव्या लागणार आहेत.
निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने शहरात हळूहळू वातावरण निर्मिती होऊ लागली आहे. बुधवारच्या प्रभाग आरक्षण निश्चितीनंतर उमेदवार जवळपास निश्चित झाले असून आता प्रत्यक्ष रणांगण तापणार आहे.
प्रभाग क्रमांक
०१ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
०१ ब – सर्वसाधारण महिला
०२. अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
०२ ब – सर्वसाधारण
०३ अ – सर्वसाधारण महिला
०३ ब – सर्वसाधारण
०४ अ – सर्वसाधारण महिला
०४ ब – सर्वसाधारण
०५ अ -नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
०५ ब – सर्वसाधारण
०६ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
०६ ब – सर्वसाधारण महिला
०७ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
०७ ब – सर्वसाधारण
०८ अ – अनुसूचित जाती महिला
०८ ब -सर्वसाधारण
०९ अ – अनुसूचित जाती
०९ ब – सर्वसाधारण महिला
१० अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
१० ब – सर्वसाधारण महिला
११ अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
११ ब – सर्वसाधारण
१२ अ – सर्वसाधारण महिला
१२ ब – सर्वसाधारण
१३ अ -अनुसूचित जाती महिला
१३ ब – सर्वसाधारण
नगरपालिका शाळा
विद्यार्थी
प्रणव नलवडे
गोरीमा तांबोळी
आशा म्हाळुंगे
साबीया तांबोळी
प्रगती नलवडे
रुद्र म्हाळुंगे
ऋषिकेश खोत