![]()
गडहिंग्लज आजरा चंदगड राष्ट्रवादीच्या वतीने वतीने अडकूर येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन
चंदगड: प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नामदार अजित दादा पवार तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे नेते तथा वैद्यकीय शिक्षण व नामदार हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा जाहीर सत्कार उद्या शुक्रवारी दिनांक 2 मे रोजी करण्यात येत आहे. चंदगड, आजरा व गडहिंग्लज तिन्ही तालुक्याच्या शेतकऱ्यांचा भव्य मेळावा सुद्धा शुक्रवारी सकाळी आयोजित करण्यात आला आहे. अडकूर तालुका चंदगड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारील महालक्ष्मी मैदानात सकाळी ९ वाजता जाहीर सत्कार व भव्य मेळावा होत आहे. अशी माहिती माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी दिली असून चंदगड आजरा व गडहिंग्लज या तिन्ही तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार पाटील यांनी केले आहे.

