शरद पॉलिटेक्निकमध्ये ४ ला ऑरनेट स्पर्धा

Loading

यड्राव : प्रतिनिधी

येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये शनिवार (ता. ४) ऑक्टोंबर रोजी ‘ऑरनेट २के२५’ या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये पेपर प्रेझेन्टेशनसह दहा विभागात विविध स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्रसह एक लाख रूपयांपेक्षा अधिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे प्रमुख उपस्थित आहेत.
पेपर प्रेझेन्टेशनमध्ये सर्व विभागातील विविध विषयावर शोध निबंध सादरीकरण होणार आहे. त्यासोबत कॅड क्लॅश, मॉक इंटव्ह्यु, रिव्हर्स कोडिंग (सी लॅग्वेज), क्विझ कॉम्पिटेशन, मॉडेलिंग ऑफ थ्रीडी प्रिंटीग, कोड झेस, वेब विझार्ड (वेब डिझाइन), लेथ वॉर, टेक्निकल क्वीझ, रोबो सोकर अशा स्पर्धा होतील.
या स्पर्धेच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यामध्ये वाढ व्हावे तसेच अभ्यासाबरोबर तांत्रिक व प्रात्यक्षिक ज्ञान अवगत व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे सर्व नियोजन प्राचार्य बी.एस.ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक प्रा.ए.वाय.केर्ले यांच्यासह प्रा.पी.एस.माने, प्रा.एस.एस.बहिरगुंडे,प्रा. एम.बी.मुलाणी,प्रा.आर.ए. शर्मा,प्रा.एन.ए.निंबाळकर, प्रा.एस.एस.जाधव,प्रा.एम. जी.सौंदते,प्रा.टी.बी. वडगांवे,प्रा.एस.बी.पाटील, प्रा.एस.एन.बोडके,प्रा. ए.एम.शिंदे व विद्यार्थ्यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *