![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी-
सहकारमहर्षी स्वर्गीय शामरावआण्णा पाटील यांच्या २१ व्या पुण्यतिथीदिनी अनेक मान्यवरांनी स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली आणि शामराव आण्णांच्या स्मृतीस अभिवादन केले.
सहकारमहर्षी शामरावअण्णा पाटील यांची २१ वी पुण्यतिथी संपन्न झाली. पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटच्या आवारात असलेल्या शामराव अण्णांच्या स्मारक स्थळावर सकाळपासून दर्शनासाठी शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते येत होते. याठिकाणी आण्णांचे स्मारक स्थळ फुलांनी सजवले होते. स्मारकस्थळी माजी राज्यमंत्री आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी स्मृतीस अभिवादन केले. कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूत गिरणीच्या कार्यस्थळावर संस्थेचे संचालक अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या वतीने स्वर्गीय शामरावआण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे असलेल्या शामराव आण्णा यांच्या अर्धपुतळ्याला शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
शरद सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर स्वर्गीय शामरावआण्णा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास युवा नेते, संचालक आदित्य पाटील यड्रावकर यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाच्यावतीने तसेच अधिकारी व कर्मचार्याच्यावतीने पुष्पहार घालून स्वर्गीय शामरावअण्णा यांच्या स्मृतीस अभिवादन केले आणि आदरांजली वाहिली. पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट येथील स्मारक स्थळावर आमदार राहुल आवाडे, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, युवा नेते आदित्य पाटील- यड्रावकर, अजय पाटील यड्रावकर, सौ. नितू पाटील यड्रावकर, प्रकाश पाटील टाकवडेकर, डी.बी.पिष्टे, थबा कांबळे, रावसाहेब कुंभोजे, अजित उपाध्ये, विद्याधर कुलकर्णी, संजय नांदणे, आण्णासो क्वाणे, सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर, यड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, कामगार नेते शामराव कुलकर्णी, संजय बोरगावे, सतीश बरगाले, प्रकाश खोत, सुनील माळी, आप्पासाहेब बडबडे, प्रकाश अकिवाटे, एस. के. पाटील, आप्पासाहेब चौगुले,
विद्यासागर मरजे, पै.केशव राऊत, डी.ए. पाटील, संभाजी मोरे, राजेंद्र मगदूम, जीवनधर मुरचिट्टे, महावीर पाटील रविकांत कारदगे, ताजोद्दीन तहसीलदार, प्रकाश लठ्ठे, बंडू बरगाले, अरशद बागवान, बाबासो नाईक, गणपती कागे, धन्यकुमार सिदनाळे, पार्वती को ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीज इस्टेटचे व्हाईस चेअरमन महावीर खवाटे, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, राजेंद्र झेले, श्रीमती प्रेमला मुरगुंडे, कुरूंदवाडचे बाळासो दिवटे, गजानन सुलतानपुरे,
बाचू बंडगर, पार्वती औद्योगिक वसाहतीचे सिईओ अभिजीत पाटील तसेच राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्यासह जयसिंगपूर, शिरोळ व कुरुंदवाड शहरातील पदाधिकारी व गावागावातून आलेले लोकप्रतिनिधी, सहकारी संस्थांचे सर्व पदाधिकारी, शरद शिक्षण व उद्योग समुहातील सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी भेट देऊन स्वर्गीय शामराव अण्णांच्या स्मृतीस अभिवादन केले.


