शरद इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे परदेशी उच्च प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण

Loading

रिअल टाईम प्रोजेक्टवर काम : यु.जी.फेलोशिप अंतर्गत संधी

यड्राव : प्रतिनिधी

येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी फ्रान्स येथील तंत्रज्ञानातील नामांकीत अविग्नॉन विद्यापीठात तांत्रिक उच्च व अत्याधुनिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
अभियांत्रिकीतील प्रगत तंत्रज्ञान, यासाठी लागणारे प्रगत साधने, आणि प्रॅक्टीकल बेस टिचिंग-लर्निग पध्दत यावर आधारीत नाविण्यपूर्ण प्रोजेक्ट फ्रान्समधील तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली केले. त्यांचे व पालकांचे स्वागत संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते करण्यात आले.

जागतिक पातळीवरील प्रगत तंत्रशिक्षणाची विद्यार्थ्यांना माहीती व्हावी या उद्देशाने प्रोजेक्ट बेस्ड लर्निग या संकल्पने अंतर्गत यु.एस.ए., डेन्मार्क, थायलंड, बल्गेरीया, इटली, ग्रीस, रशिया, बल्गेरिया आदी देशातील नामांकित टेक्निकल युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या देशातून आतापर्यंत ५५ हून अधिक विद्यार्थ्यांनी फेलोशिप पूर्ण केले आहे.नुकतेच फ्रान्स येथील अविग्नॉन विद्यापीठात विद्यापीठमध्ये तेजस पुरेकर, अभिषेक पाटील यांनी ४५ दिवसाचे उच्च प्रशिक्षण पूर्ण केले.

या प्रशिक्षण काळात तेजस पुरेकर ह्याने “एआय आणि एमएल वापरून ५जी मॉनिटरिंग आणि ६जी नेटवर्क्सचे सिम्युलेट करण्यासाठी डिजिटल ट्वीन” तर अभिषेक पाटील याने “अर्बन सिंक” क्राउडसोर्स्ड डिजिटल ट्विन सिटी.” हे प्रोजेक्ट पूर्ण केले. पदवीच्या विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये काम कसे हाताळले जाते आणि कोणत्या अचूकतेने काम केले जाते याचा सुध्दा अनुभव मिळाला. ह्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे महाविद्यालयाकडून स्वागत करण्यात आले. यावेळी प्रोजेक्ट बेसड लर्निंगच्या समन्वयक प्रा.धनश्री बिरादार, प्रा.प्राची लंगडे उपस्थीत होत्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *