जयसिंगपुरात दहीहंडी उत्सवास अभूतपूर्व प्रतिसाद : जय हनुमान तालीम गोविंदा पथक मानकरी 

जयसिंगपुरात दहीहंडी उत्सवास अभूतपूर्व प्रतिसाद : जय हनुमान तालीम गोविंदा पथक मानकरी 

Loading

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात दिमाखदार सोहळा 

जयसिंगपूर : प्रतिनिधी

जयसिंगपुर दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शनिवारी 23 रोजी सायंकाळी पाच वाजता ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात दिमाखदार असा दहीहंडी सोहळा झाला. शिरोळ येथील गोड़ीविहीर तालीम मंडळ ( एस.पी. बॉइज ) व जय हनुमान तालीम गोविंदा पथकाने या स्पर्धेत मोठा उत्साह व थरार दाखवला. दोघांनीही देखील दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकाच्या माध्यमातून थर लावून थरारक खेळ दाखविला. 18 वर्षानंतर घेण्यात आलेल्या या दहीहंडी स्पर्धेत अखेर जय हनुमान तालीम गोविंदा पथक पाचव्या थरात हंडी फोड़ून 1 लाख 11 हजार 111 रूपयांचा मानकरी ठरले.यावेळी नागरिकांच्या मनोरंजनासाठी अभिनेत्री हिना पांचाल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुंबईच्या सानिका नागवेकर व सहकाऱ्यांची नृत्याच्या अदाकारीने नागरिकांना प्रत्येक नृत्यावर ठेका धरायला लावला. राधिका शर्मा व शाहरुख अँकरनी तर महिला वर्गाला विविध मिमिक्री मधून हास्य पिकवले. तब्बल 18 वर्षाच्या कालखंडानंतर झालेल्या दहीहंडी स्पर्धेला महिलांची लक्षणीय संख्या होती. मैदान संपूर्णतः गर्दीने भरले आणि भारले. 
प्रारंभी माजी मंत्री आम.डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, जि.प.चे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक, अभिनेत्री हिना पांचाल, उद्योगपती अशोकराव कोळेकर, राजेंद्र बलदवा, महेंद्र रजपूत व शिरोळचे पृथ्वीराज यादव, उद्यापंडित गणपतराव पाटील यांचे नातू वरूण पाटील, दानोळीचे राम शिंदे, जयसिंगपूर प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या प्रमुख राणी बहेणजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्री संत सेना महिला भजनी मंडळ यांच्या हस्ते पाळणा गीत गायन झाले. स्वागत दहीहंडी उत्सव समितीचे संयोजक राजेंद्र दाइंगडे यांनी केले.प्रास्ताविक संतोष जाधव यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *