![]()
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी कारखान्याची कर्तव्यदक्षता

शिरोळ : प्रतिनिधी
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊसतोड मजुरांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते. कारखान्याच्या ऊस तोडणी मजुराच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून अपघात विमा पॉलिसी घेतली आहे. दुर्दैवाने एखाद्या ऊसतोड मजुराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला विम्याची रक्कम पॉलिसीमुळे मिळते. सदर विमा पॉलिसी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचे कडून धारण केलेली आहे. याच पॉलिसी अंतर्गत श्रवण बाबुराव राठोड रा. नरवाडी ता. सोनपेठ जिल्हा परभणी यांचा दिनांक 24 /5 /25 रोजी साप चावून मृत्यू झाला. पॉलिसी अंतर्गत त्यांचे वारस शोभा श्रावण राठोड यांना 3 लाख रुपये चा धनादेश दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील दादा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी ऊस वाहतूक संघटना अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर, रावसाहेब आबदार, शिवाजीराव देशमुख, उदय शिलेदार, कल्लेश्वर वाघमोडे, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, अमर चौगुले, इन्शुरन्स कंपनीचे सदानंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
