![]()
रोटरी क्लब ट्रेड सिटी चा उपक्रम
जयसिंगपूर : प्रतिनिधी –
रोटरी क्लब ट्रेड सिटी तर्फे बस कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना जिलेबीचे वाटप करण्यात आले.
भारताच्या स्वातंत्र्याच्या 79 व्या वर्धापनानिमित्त स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब ट्रेड सिटी तर्फे हा उपक्रम राबवण्यात आला.


स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वजण सुट्टीचा उपभोग घेत असतात पण ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना आपले कर्तव्य बजावावे लागते. बस कंडक्टर व ड्रायव्हर यांच्या सोबत स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करावा या हेतूने ट्रेड सिटी च्या सदस्यांनी जयसिंगपूर बस स्थानक येथे त्यांना जिलेबी देऊन त्यांचे कौतुक केले.
यावेळी रोटरी ट्रेड सिटी चे अध्यक्ष डॉ. अतीक पटेल, सेक्रेटरी महेंद्र पोरवाल, उदय कुलकर्णी, मिलिंद भिडे, सुनील पाटील, शिवराज पाटील, रमेश यळगुडकर व वाहतूक नियंत्रक व इतर स्टाफ उपस्थित होते.