![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ ट्रेड सिटी मार्फत जागतिक स्तनपान दिनानिमित्त व्याख्यान संपन्न झाले.
प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर येथे जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताह निमित्त स्तनपानाचे महत्त्व या विषयावर हा उपक्रम राबवण्यात आला.
स्तनपानाचे महत्त्व बाळासाठी किती आवश्यक व गरजेचे आहे याबाबतीत डॉक्टर उर्मिला भिडे यांनी माहिती दिली. तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी प्रस्ताविका मध्ये गरोदर मातांसाठी व स्तनपान करणाऱ्या आवश्यक असणारे औषध उपचार व मार्गदर्शन प्राथमिक आरोग्य केंद्र मधून दिले जाईल असे सांगितले.

स्वागत रोटरी ट्रेड सिटी चे अध्यक्ष डॉ अतीक पटेल यांनी केले तर आभार सचिव महेंद्र पोरवाल यांनी मानले.
