कु.अदिती पाटिलचे सुयश : शिवाजी विद्यापीठात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात तृतीय

Loading

हातकंणगले : प्रतिनिधी

 येथील पत्रकार विनयकुमार दादा पाटील व भाऊसो चौगुले बालविद्या मंदीरच्या मुख्याध्यापिका सौ.तेजस्विनी विनयकुमार पाटील यांची कन्या कुमारी अदिती ही डी.वाय.पाटील शैक्षणिक संकूल तळसंदे येथील विद्यार्थीनी आहे.ती कॅम्प्युटर इंजिनिअरिंग या विभागात शिवाजी विद्यापीठात तिसरा क्रमाक मिळवून उतीर्ण झाली आहे. तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील,माजी आम.त्रुतूराज पाटील यांच्या वतीने यथोचीत सत्कार करण्यात आला.कु.अदिती ही लहानपणापासून हुशार होती पहिली ते बारावी पर्यंत प्रत्येकी वर्षी चांगल्या मार्काने पास होवून अनेक स्पर्धेत तिने यश संपादन केले आहे.या अगोदर ही तिचा अनेक ठिकाणी सत्कार झाला. 

चार वर्षाच्या तिच्या इंजिनिअरिंगच्या काळात आई वडीलांबरोबर संस्थेच्या सर्व संस्था चालकाचे व सर्व प्राध्यापक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले भरपूर अभ्यास करून वरील यश सपादंन केल्या बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा कार्यक्रम तळसंदे येथे पार पडला या वेळी तिची आजी, काका, काकी, आई, वडील संस्थेचे विश्वस्त श्री.गुप्ता.श्री.पावसकर. प्रा उमेश पाटील प्रा.केदार सहस्त्रबुध्दे प्रा.सौ. शिरढोणे यांचेसह शैक्षणिक संकुलमधील सर्व प्राध्यापक कर्मचारी वर्ग अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *