![]()
प्रा. सुनील शिंत्रे यांचे प्रतिपादन
आजरा : प्रतिनिधी

आमच्या भागात शक्तिपिठाचा संबंध नव्हता ज्यावेळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेसाहेब यांनी शेतकऱ्यांसाठी दिंडी काढण्यासाठी सांगितले तेव्हा जिल्हाप्रमुख म्हणून खेड्यापाड्यातून फिरलो. त्यावेळी त्यावेळी शेतकऱ्यांनी म्हटले आम्हाला शक्तिपीठ नको आम्हांला कर्जमाफी हवीय. अशी खणखणीत मागणी प्रा. सुनील शिंत्रे यांनी केली. शक्तीपीठ महामार्ग विरोधी एकवटलेल्या बळीराजाच्या मोर्चामध्ये प्रा शिंत्रे बोलत होते. ज्या शक्तिपीठासाठी 86 हजार कोटी खर्च करताय त्या खर्चात आमच्या शेतकऱ्यांच्या दोनवेळा कर्जमाफी होऊ शकते. असा सल्ला देत गोव्याला जाण्यासाठी कितीतरी रस्ते आमच्या भागामध्ये आहेत. नागपूरपासून रत्नागिरीकडे जाणारा तोही रस्ता असतेवेळी या शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? असा सवाल ही प्रा. शिंत्रे यांनी उपस्थित केला.
यावेळी शक्तिपीठाच्या समर्थनार्थ सरकारने जमा केलेले सातबारा हे कोणत्याही बाधित शेतकऱ्यांचे नाहीत. अडानी आणि अंबानीच्या पैशाचा मोह या सरकारला आहे. असा आरोप विजय देवणे यांनी केला. तर जिल्ह्याचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तीपिठासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी. असे आवाहन त्यांनी केले. कॉ. संजय तर्डेकर यांनी शक्तिपीठामुळे अनेक गावांचे विभाजन होणार याची भीती व्यक्त करीत भागाच्या विकासासाठी रेल्वे मार्गाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी अमर चव्हाण,राजेंद्र गड्यांनावर, कॉ. संपत देसाई, कॉ. अतुल दिघे, तानाजी देसाई, कॉ. शिवाजी गुरव, राहुल देसाई यांनीही शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला. आजरा तहसील कार्यालयाला याबाबतचे निवेदन देण्यात आले.
यावेळी मुकुंददादा देसाई, अंजनाताई रेडेकर,उमेश आपटे, विद्याधर गुरबे, गोपाळराव पाटील, संभाजी पाटील, कॉ. सम्राट मोरे, संभाजी सरदेसाई, रियाजभाई शमनजी, अल्बर्ट डिसोझा, सुभाष देसाई, डॉ. धनाजी राणे, संजयभाऊ सावंत,अभिषेक शिंपी, नौशादभाई बुडडेखान, आरिफभाई खेडेकर, प्रभाकर कोरवी, डॉ. धनाजी राणे,प्रकाश पाटील, रवींद्र भाटले, कॉ. संजय घाटगे, विक्रम देसाई,युवराज पोवार,सचिन घोरपडे, रणजित देसाई, बिलाल लतीफ, निवृत्ती कांबळे, दिनेश कांबळे यांच्यासह महिला, शेतकरी तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
